खामगांव (प्रखर प्रहार): खामगांव नगर परिषदेतील काँग्रेस-वंचित युतीमध्ये नगराध्यक्षपद वंचित बहुजन आघाडीला सुटल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. जर ही बाब खरी ठरली, तर कृषीउत्पन्न बाजार समिती (एपीएमसी) निवडणुकीचा थेट परिणाम नगरपरिषद निवडणुकीवर झाल्याचे म्हणावे लागेल. यामुळे काँग्रेसची मते भाजपच्या उमेदवाराला जाण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. मुस्लिम आणि बौद्ध समाजाच्या मतांवर अवलंबून असलेल्या वंचित उमेदवाराला विजय मिळवणे कठीण असल्याने भाजपचा उमेदवार सरळ विजयी होईल, असा अंदाज राजकीय तज्ज्ञांनी वर्तवला आहे.
धार्मिक ट्रस्ट कसा चालवावा, याचे जिवंत उदाहरण म्हणजे शेगावचे श्री संत गजानन महाराज संस्थान
भाजपकडून ना. आकाश फुंडकर यांच्या घरातीलच उमेदवाराला नगराध्यक्षपदासाठी पाठिंबा दिल्याने हा उमेदवार पडू नये यासाठी ही रणनीती रचली गेली असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. येणाऱ्या २०२९ च्या विधानसभा निवडणुकीत खामगांव मतदारसंघ राखीव होण्याची शक्यता लक्षात घेता, ही छुपी युतीची निर्मिती त्याच दृष्टीने झाली असू शकते. राखीव झाल्यास वंचितचा एक नेता भाजपच्या चिन्हावर लढेल, असा धक्कादायक अंदाज व्यक्त केला जात आहे. कदाचित कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीच्या आडोशाला ही योजना आखली गेली असावी.
शेवटी धूर्त राजकारणींनी डाव साधला
सर्व पक्षातील दुसऱ्या फळीतील पदाधिकाऱ्यांना नेते म्हणून उदयास येऊ नये यासाठी ही मोर्चेबांधणी झाली असल्याचा अंदाज आहे. भाजपकडून घरातीलच उमेदवार दिल्यास पक्षातील अनेकजण नाराज होऊ शकतात आणि त्याचा फायदा काँग्रेसच्या उमेदवाराला होऊन तो विजयी होईल. अशा परिस्थितीत दुसऱ्या फळीतील एक पदाधिकारी शहराच्या राजकारणात नेता म्हणून पुढे येईल. या नेत्यांना थांबविण्यासाठी शहरातील धूर्त राजकारणी कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीच्या माध्यमातून हा खेळ खेळत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगत आहे.











वंचित काँग्रेस युती मुळेच पत्रकार धास्तावले