हवामानबाजारभावशासन निर्णयनिवडणूकक्राईमनोकरीयोजनाफायनान्सलाइफस्टाइलगुंतवणूकऑटोएआयखेळआध्यात्मिकसिनेमा

ब्रेकिंग
खामगाव: पिंपळगाव राजा येथील प्राचीन शिव मंदिचिमुरडीवर अत्याचार करणाऱ्यांना चौकात फाशी दकाँग्रेस-वंचित युती कार्यकर्त्यांना राजकीय भाजप ला बौद्ध समाजासह ब्राम्हण समाजाची सुद्धखामगाव तालुक्यात पिसाळलेल्या कुत्र्याची दहडॉ. संजय कुटेंना बौद्ध समाजाची एलर्जी पक्षाच

काँग्रेस-वंचित युती कार्यकर्त्यांना राजकीय जीवनदान देणारी; शिवसेना शिंदे गट सामील झाल्यास ३० वर्षांपासून शहर गाजवणाऱ्यांना लगाम!

On: November 15, 2025 6:16 PM
Follow Us:
congress vanchit yuti khamgaon

खामगांव (प्रखर प्रहार): मागील अनेक वर्षांपासून लोकसभा-विधानसभा निवडणुकांमध्ये काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडीच्या युतीच्या चर्चा फिस्कटल्या. यामुळे नगरपरिषद, जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या आगामी निवडणुकांबाबत संभ्रम निर्माण झाला होता. मात्र, आता दोन्ही पक्षांनी एकत्रित पत्रकार परिषद घेऊन युतीची अधिकृत घोषणा केल्याने कार्यकर्त्यांमध्ये आनंद आणि उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका प्रत्येक पक्षातील कार्यकर्त्यांसाठी राजकीय जीवनदान ठरणाऱ्या असतात. युती झाल्यास उमेदवारांच्या विजयाची शक्यता वाढते. तिरंगी किंवा चौरंगी लढतीत बलाढ्य पक्षांच्या उमेदवारांकडे पक्षशक्ती आणि आर्थिक बळ असते. यामुळे छोट्या पक्षांचे कार्यकर्ते कमकुवत ठरतात; ते एकतर निवडणुकीतून माघार घेतात किंवा पराभव स्वीकारतात. स्वबळावर लढण्याच्या निर्णयाला कार्यकर्ते विरोध करतात, परंतु वरिष्ठ नेत्यांपुढे त्यांचे काही चालत नाही.

मागील अनेक वर्षांपासून अशी युती न झाल्याने अनेक कार्यकर्ते वयोवृद्ध झाले असून त्यांना पक्षाकडून काहीच मिळाले नाही. प्रमुख नेत्यांच्या मार्गदर्शनाखालील मोजक्या कार्यकर्त्यांनाच लाभाचे पद किंवा काम मिळाले. सामान्य कार्यकर्त्यांचे जीवन व्यर्थ गेले असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. आजही अनेक जुन्या नेते-कार्यकर्ते आर्थिक अडचणीत जीवन जगत आहेत. वरिष्ठ नेत्यांच्या जवळच्या स्थानिक नेत्यांच्या चेल्यांनाच उदरनिर्वाहाची साधने मिळाली असून असे कार्यकर्ते बोटावर मोजण्याइतके आहेत.

येणाऱ्या निवडणुकीत पक्षनिष्ठ कार्यकर्त्यांना न्याय मिळेल अशी अपेक्षा आहे. काँग्रेस-वंचित युती कार्यकर्त्यांना राजकीय जीवनदान देणारी ठरेल, असे राजकीय विश्लेषकांचे मत आहे. शिवसेना शिंदे गटही युतीत सामील झाल्यास गेल्या ३० वर्षांपासून शहराचे राजकारण चालवणाऱ्यांना लगाम बसेल, अशी चर्चा आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

हे पण वाचा

नांदुरा – डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त केवळ जल्लोष न करता, ज्ञानप्रसार आणि गरजू विद्यार्थ्यांना मदत करण्याचा स्तुत्य उपक्रम ‘सद् धम्म प्रबोधन आणि विपश्यना प्रशिक्षण ट्रस्ट’ने राबवला. नांदुरा येथे आयोजित कार्यक्रमात आदिवासी विद्यार्थ्याला आर्थिक मदत, महिलांना मोफत ग्रंथवाटप आणि पत्रकारांचा सन्मान यातून बाबासाहेबांच्या विचारांचा खरा वारसा साजरा करण्यात आला.

बुलडाणा बसस्थानकावर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या पूर्वसंधेला माता भिमाई व बाबासाहेबांना अभिवादन

खामगाव – आत्मसन्मान फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष डॉ. विजय पाटील आणि त्यांच्या पत्नी शुभांगी पाटील या दांपत्याला बहुजन उद्धारक सेवा समिती, मलकापूर यांच्या वतीने ‘फुले दांपत्य २०२६’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

खामगावकरांचे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना सकाळी ६ वाजता अनोखे अभिवादन

खामगाव : डॉ. प्रवीणभाई तोगडिया यांचे हिंदुत्ववादी संघटनांच्या वतीने भव्य स्वागत; संघटित हिंदू समाजाची गरज अधोरेखित

बुलडाणा : डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराने प्रेरित रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट)तर्फे चिखली विधानसभा मतदारसंघाच्या आमदार श्वेताताई महाले पाटील आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे खासगी सचिव विद्याधरजी महाले यांचा भव्य सत्कार

Leave a Comment