हवामानबाजारभावशासन निर्णयनिवडणूकक्राईमनोकरीयोजनाफायनान्सलाइफस्टाइलगुंतवणूकऑटोएआयखेळआध्यात्मिकसिनेमा

ब्रेकिंग
शहरातील राजकारण नीच पातळीला; पती-पत्नीच्या पप्रखर प्रहार ब्रेकिंग: भाजप ची नगराध्यक्षा नखामगावात क्रीडा क्रांती! युगधर्म पब्लिक स्कूस्व. संजय ठाकरे पाटील यांची जयंती विविध कार्यकाँग्रेस-वंचित युतीने राजकारणाचे पासे पलटण्धम्मदीप बुद्धविहार कोथळी येथे रामजी सपकाळ या

प्रखर प्रहार ब्रेकिंग: भाजप ची नगराध्यक्षा निवडून यावी यासाठीच काँग्रेसची जागा वंचितला का?

On: November 16, 2025 7:18 PM
Follow Us:
khamgaon election

खामगांव (प्रखर प्रहार): खामगांव नगर परिषदेतील काँग्रेस-वंचित युतीमध्ये नगराध्यक्षपद वंचित बहुजन आघाडीला सुटल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. जर ही बाब खरी ठरली, तर कृषीउत्पन्न बाजार समिती (एपीएमसी) निवडणुकीचा थेट परिणाम नगरपरिषद निवडणुकीवर झाल्याचे म्हणावे लागेल. यामुळे काँग्रेसची मते भाजपच्या उमेदवाराला जाण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. मुस्लिम आणि बौद्ध समाजाच्या मतांवर अवलंबून असलेल्या वंचित उमेदवाराला विजय मिळवणे कठीण असल्याने भाजपचा उमेदवार सरळ विजयी होईल, असा अंदाज राजकीय तज्ज्ञांनी वर्तवला आहे.

धार्मिक ट्रस्ट कसा चालवावा, याचे जिवंत उदाहरण म्हणजे शेगावचे श्री संत गजानन महाराज संस्थान

भाजपकडून ना. आकाश फुंडकर यांच्या घरातीलच उमेदवाराला नगराध्यक्षपदासाठी पाठिंबा दिल्याने हा उमेदवार पडू नये यासाठी ही रणनीती रचली गेली असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. येणाऱ्या २०२९ च्या विधानसभा निवडणुकीत खामगांव मतदारसंघ राखीव होण्याची शक्यता लक्षात घेता, ही छुपी युतीची निर्मिती त्याच दृष्टीने झाली असू शकते. राखीव झाल्यास वंचितचा एक नेता भाजपच्या चिन्हावर लढेल, असा धक्कादायक अंदाज व्यक्त केला जात आहे. कदाचित कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीच्या आडोशाला ही योजना आखली गेली असावी.

शेवटी धूर्त राजकारणींनी डाव साधला

सर्व पक्षातील दुसऱ्या फळीतील पदाधिकाऱ्यांना नेते म्हणून उदयास येऊ नये यासाठी ही मोर्चेबांधणी झाली असल्याचा अंदाज आहे. भाजपकडून घरातीलच उमेदवार दिल्यास पक्षातील अनेकजण नाराज होऊ शकतात आणि त्याचा फायदा काँग्रेसच्या उमेदवाराला होऊन तो विजयी होईल. अशा परिस्थितीत दुसऱ्या फळीतील एक पदाधिकारी शहराच्या राजकारणात नेता म्हणून पुढे येईल. या नेत्यांना थांबविण्यासाठी शहरातील धूर्त राजकारणी कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीच्या माध्यमातून हा खेळ खेळत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगत आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

हे पण वाचा

पिंपळगाव राजा येथील गांजा प्रकरणात तपास अधिकारी दिवसभर गायब; बारा तास होऊन ही गुन्हा दाखल नाही. पत्रकारांसोबत हुज्जत करणाऱ्या एपिआय मुंढे वर कारवाई होणार का?

नांदुरा – डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त केवळ जल्लोष न करता, ज्ञानप्रसार आणि गरजू विद्यार्थ्यांना मदत करण्याचा स्तुत्य उपक्रम ‘सद् धम्म प्रबोधन आणि विपश्यना प्रशिक्षण ट्रस्ट’ने राबवला. नांदुरा येथे आयोजित कार्यक्रमात आदिवासी विद्यार्थ्याला आर्थिक मदत, महिलांना मोफत ग्रंथवाटप आणि पत्रकारांचा सन्मान यातून बाबासाहेबांच्या विचारांचा खरा वारसा साजरा करण्यात आला.

बुलडाणा बसस्थानकावर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या पूर्वसंधेला माता भिमाई व बाबासाहेबांना अभिवादन

खामगाव – आत्मसन्मान फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष डॉ. विजय पाटील आणि त्यांच्या पत्नी शुभांगी पाटील या दांपत्याला बहुजन उद्धारक सेवा समिती, मलकापूर यांच्या वतीने ‘फुले दांपत्य २०२६’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

खामगावकरांचे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना सकाळी ६ वाजता अनोखे अभिवादन

खामगाव : डॉ. प्रवीणभाई तोगडिया यांचे हिंदुत्ववादी संघटनांच्या वतीने भव्य स्वागत; संघटित हिंदू समाजाची गरज अधोरेखित

1 thought on “प्रखर प्रहार ब्रेकिंग: भाजप ची नगराध्यक्षा निवडून यावी यासाठीच काँग्रेसची जागा वंचितला का?”

Leave a Comment