हवामानबाजारभावशासन निर्णयनिवडणूकक्राईमनोकरीयोजनाफायनान्सलाइफस्टाइलगुंतवणूकऑटोएआयखेळआध्यात्मिकसिनेमा

ब्रेकिंग
भाजप ला बौद्ध समाजासह ब्राम्हण समाजाची सुद्धस्व. संजय ठाकरे पाटील यांची जयंती विविध कार्यशहरातील राजकारण नीच पातळीला; पती-पत्नीच्या पडॉ. संजय कुटेंना बौद्ध समाजाची एलर्जी पक्षाचखामगांवमध्ये आद्य क्रांतिगुरू लहुजी वस्ताद काँग्रेस-वंचित युतीने राजकारणाचे पासे पलटण्

जिल्हा शल्य चिकित्सक झोपला की काय? नियम पायदळी तुडविणाऱ्या डॉ. अरबटवर कारवाई कधी? पीडित महिलेचा सवाल!

On: March 9, 2026 7:22 PM
Follow Us:

डॉ. राजेश अरबट यांचे प्रसूतीपूर्व लिंग निदान प्रकरण…

प्रखर प्रहार: सर्वसामान्य जनतेसाठी वेगळा न्याय तर डॉ. अरबट यांच्यासाठी दुसरा, अशा प्रकारची कारवाई होत असल्याचे दिसून येत आहे. प्रसूतीपूर्व लिंग निदान प्रकरणात अद्यापपर्यंत डॉ. अरबट यांच्यावर कोणतीही कारवाई न झाल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.

जाहिरात

एका महिन्यापूर्वी हिवराळे नामक महिलेने जिल्हा शल्य चिकित्सक यांच्याकडे लेखी तक्रार दाखल केली असून, सदर तक्रारीत त्यांची फसवणूक झाल्याचे नमूद केले आहे. सदर महिलेचे प्रसूतीपूर्व लिंग निदान करून आपल्याला मुलगाच होईल असे सांगून त्या महिलेकडून जवळपास अट्ठेचाळीस हजार रुपये घेतल्याचेही तक्रारीत नमूद केले आहे.

जाहिरात

वास्तविक पाहता प्रसूतीपूर्व लिंग निदान हे कायद्याने बंद असतानाही सर्व नियम धाब्यावर बसवून सदर महिलेला, तुम्हाला आधीच्या चार मुली आहेत याचा फायदा घेत, डॉ. अरबट यांच्या संपर्कात असलेल्या नांदुरा येथील एका खाजगी हॉस्पिटलमध्ये काम करणाऱ्या काही महिलांनी फूस लावली. आम्ही मुलगा आहे की मुलगी हे निश्चित करून सांगतो, तुम्हाला आधीच्या चार मुली आहेत, यानंतर तुम्हाला मुलगाच होईल अशी खात्री देत सदर महिलेला विश्वासात घेतले.

परंतु महिलेची प्रसूती झाल्यानंतर तिला पुन्हा मुलगीच झाली. त्यानंतर त्या महिलेला आपली फसवणूक झाल्याची खात्री झाल्याने तिने जिल्हा शल्य चिकित्सक तसेच शहर पोलीस स्टेशन येथे लेखी तक्रार दिली. मात्र जिल्हा शल्य चिकित्सक यांनी आजपर्यंत कोणतीही कारवाई केली नसल्याचे समोर आले आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

हे पण वाचा

Leave a Comment

WhatsApp Join Group!