नुसते नावातच कर्तव्यदक्ष असणारे अ.पोलीस अधीक्षक श्रेणिक लोढा लक्ष देणार का?
प्रखरप्रहार (प्रतिनिधी): संपूर्ण शहरातील गोरगरिबांचे अतिक्रमण काढून धनदांडग्या मोजक्या खाजगी लोकांनी संपूर्ण कुंपणाने बंदिस्त केले. ज्यामुळे पायी चालणाऱ्या नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण झाला असतांना कर्तव्यदक्ष म्हणून परिचित असलेले परंतु खामगाव शहरात कोणत्याच प्रकरणात ठोस भूमिका न घेणारे अप्पर पोलीस अधीक्षक श्रेणिक लोढा यांनी वाहतुकीस अडथडा निर्माण करणाऱ्या एकाही खाजगी व्यक्तीच्या विरोधात कारवाई केलेली नाही.

त्यातीलच एक असलेले केला हिंदी हायस्कुल संस्थेने सुद्धा शहरातील मुख्य रस्ता असलेल्या नांदुरा रोड पर्यंत तारेचे कुंपण घालेले आहे. असे असतांना या कुंपणामुळे पायी चालणाऱ्या नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण झालेला असतांना पोलीस विभागाकडून कोणतीच कारवाई करण्यात आलेली नाही. इथंपर्यंत ठीक आहे. परंतु आज रोजी दहावीच्या परीक्षा सुरु झाल्या असतांना केला हिंदी शाळेने मुख्य रस्ता असलेल्या नांदुरा रोडवरील गेट उघडे ठेऊन त्या गेट मधून विद्यार्थ्यांना पेपर देण्यासाठी जावे लागत आहे. विद्यार्थ्यांना पेपर सोडविण्यासाठी अनेक पालक मुलांना मोटार सायकल वरून घेऊन येत असून सदर च्या त्या गेट च्या बाजूला तारेचे कुंपण घातले असल्याने पालकांना आपल्या मोटार सायकली ह्या मुख्य रस्त्यावर उभ्या कराव्या लागत आहेत त्यामुळे त्या ठिकाणी मोठी गर्दी झालेली पहावयास मिळत आहे. अश्यातच वर्षभर अभ्यास करणाऱ्या एखाद्या पेपर देण्यासाठी आलेल्या विद्यार्थ्यांला गाडीचा धक्का लागून तुला इजा झाल्यास कोण जबाबदर राहणार. एखाद्या विदयार्थ्यांचा हात किंवा पाय मोडल्यास ज्यामुळे त्या विद्यार्थ्याला पेपर सोडविण्यापासून वंचित राहावे लागल्यास कोण जबाबदर राहणार?. एखाद्या विद्यार्थी पेपर न दिल्याने त्याचे वर्ष वाया गेल्यास कोण जबाबदार राहणार?
याच शाळेला तिन्ही बाजूने मोठं मोठे गेट आहेत त्यातच पंचायत समितीकडूनही मोठे गेट आहे. ते गेट बंद करून या शाळा प्रशासनाने मुख्य रस्त्यावरील गेट मधून विद्यार्थ्यांना ये-जा करण्यासाठी उघडे ठेवले आहे. “आमचे कुणीही काही वाकडे” करू शकत नाही अश्या अविर्भावात शाळा प्रशासन वावरतांना दिसून येत आहे. अर्थात त्यांचे सुद्धा बरोबरच आहे.रस्त्यावर भले मोठे तारेचे कुंपण करून सुद्धा वाहतुकीस अडथडा निर्माण करून सुद्धा पोलिसांनी त्यांना साठी नोटीस सुद्धा दिली नसल्याने आपलं कुणीच काही करू शकत नाही. हे त्यांना माहिती असावे.
येणाऱ्या पुढील पंधरा दिवसाच्या काळात दहावीच्या मुलांचे पेपर आहेत. म्हणजेच या रस्त्यावर अजून पंधरा दिवसापर्यंत विदयार्थी ये-जा करणार आहेत. या काळात एखाद्या विदयार्थ्यांना कोणत्याही गाडीचा धक्का लागून त्याचे शैक्षणिक नुकसान झाल्या त्याची संपूर्ण जबाबदारी पोलीस विभागाची राहील याची नोंद संपूर्ण पोलीस प्रशासनाने घ्यावी. तूर्तास एव्हढेच.










