खामगांव (प्रखर प्रहार): येथील सती फेल भागातील स्व. अमरसिंग रणजितसिंग चव्हाण यांचे ब्रेन हॅमरेजने नुकतेच दुःखद निधन झाले. हनुमान व्यायाम मंडळाचे माजी अध्यक्ष श्री. रज्जुभैय्या चव्हाण यांचे बंधू स्व. अमरसिंग चव्हाण यांच्या निधनाने शोकाकुल कुटुंबाला सांत्वन देण्यासाठी केंद्रीय मंत्री तथा खासदार ना. श्री. प्रतापराव जाधव यांनी त्यांच्या घरी सात्वनपर भेट दिली.
यावेळी शिवसेना तालुका प्रमुख श्री. राजेंद्र बघे, शहर प्रमुख श्री. चेतन ठोंबरे, शहर समन्वयक श्री. तब्बू तायडे, शहर संघटक श्री. विक्की जवंजाळ, उपशहर प्रमुख श्री. भाऊ बिडकर, श्री. राहुल ठोंबरे, कामगार सेना जिल्हा प्रमुख श्री. निलेश बोरे हे उपस्थित होते.
शोकाकुल कुटुंबातील श्री. रजपाल सिंग चव्हाण, श्री. चरण सिंग चव्हाण, श्री. जसवंत सिंग शीख, श्री. नानक सिंग चव्हाण, श्री. ईश्वर सिंग चव्हाण, श्री. गुरमीतसिंग चव्हाण, श्री. बलजीत सिंग चव्हाण, श्री. मनप्रीतसिंग चव्हाण, श्री. गुरप्रीत सिंग चव्हाण, श्री. अमनसिंग चव्हाण, श्री. गुरमुख सिंग चव्हाण, श्री. तरणजीतसिंग चव्हाण, श्री. पप्पू सिंग जाट, श्री. त्रिलोकसिंग मेहरा आदी उपस्थित होते.










