अनेक वर्षांपासून भाजपसाठी अहोरात्र काम करणारे आणि गेल्या विधानसभा निवडणुकीत पक्षाहितासाठी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतलेल्या अमोल अंधारे यांनी पुन्हा एकदा पक्षहीत जोपासात भाजप कार्यकर्ते पवन गरळ यांच्या पत्नीच्या विरुद्ध अमोल अंधारे यांचे सहकारी निकटवर्ती म्हणून परिचित असलेले बिडकर यांच्या पत्नीचा शिवसेना शिंदे गट यांच्या तर्फे अर्ज दाखल झाल्याने गरळ यांच्या अडचणी वाढल्या होत्या परंतु, स्थानिक प्रतिष्ठित नागरिकांनी अमोल अंधारे यांना केलेल्या विनंती नंतर अंधारे यांनी बिडकर यांची समजूत काढत बिडकर यांचा उमेदवारी अर्ज मागे घेऊन पवन गरळ यांच्या पत्नीला अविरोध निवडून आणून पक्षहीत जोपासले आहे.
नगराध्यक्ष पद हे सर्वसाधारण निघाल्याने अमोल अंधारे यांना उमेदवारी मिळेल अशी अपेक्षा त्यांच्या कार्यकर्त्यांची होती परंतु फुंडकर परिवारातच सदर ची उमेदवारी दिल्याने अनेकांना धक्का बसला आहे. तरी सुद्धा अमोल यांनी पक्षासाठी आपली जबाबदारी स्वीकारत पवन गरळ यांच्या पत्नीला पहिल्या अविरोध नगरसेवक होण्याचा मान मिळवून देऊन पक्षनिष्ठा कायम ठेवली आहे.










