हवामानबाजारभावशासन निर्णयनिवडणूकक्राईमनोकरीयोजनाफायनान्सलाइफस्टाइलगुंतवणूकऑटोएआयखेळआध्यात्मिकसिनेमा

ब्रेकिंग
काँग्रेस-वंचित युती कार्यकर्त्यांना राजकीय डॉ. संजय कुटेंना बौद्ध समाजाची एलर्जी पक्षाचकाम बंद पडलेला भुयारी मार्ग, आंदोलन/उपोषण आणि भाजप ला बौद्ध समाजासह ब्राम्हण समाजाची सुद्धकेंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांची खामगांशहरातील राजकारण नीच पातळीला; पती-पत्नीच्या प

काँग्रेस-वंचित युती भाजपच्या पथ्यावर? दोन्ही पक्षांनी अर्ज दाखल केल्याने विजयात अडथळा, भाजपचा मार्ग मोकळा!

On: November 18, 2025 6:47 PM
Follow Us:
Khamgaon rajkaran

खामगांव (प्रखर प्रहार): जिल्ह्यात काँग्रेस वंचितच्या युतीच्या घोषणेसाठी घेण्यात आलेली दोन्ही पक्षांची संयुक्त पत्रकार परिषद झाल्यानंतर दोन्ही पक्षातील कार्यकर्त्यांमध्ये कमालीचा उत्साह संचारलेला पहायला मिळाला. हा आनंद फारकाळ टिकला नाही.

अर्ज भरण्याच्या आदल्यादिवशी वंचित साठी सोडण्यात आलेल्या मतदारसंघांची यादी सोशलमीडियावर आल्यानंतर मात्र अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला. त्यातीलच एक मतदारसंघ खामगाव नगर परिषद साठी सर्वात आधी काँग्रेसकडून नगराध्यक्ष पदासाठी किशोर भोसले यांच्या पत्नीचे नाव फायनल करण्यात आले होते. त्यानुसार त्यांनी काँग्रेसकडून आपला अर्ज भरण्याची तयारी असतानाच खामगावची जागा युतीमध्ये वंचितच्या वाट्याला आली असल्याची माहिती वाऱ्यासारखी पसरली.

त्यामुळे वंचितने आपला उमेदवार शोधणे सुरू केले. विधानसभेची पुनरावृत्ती होणार असल्याचे समाज बांधवांच्या लक्षात आल्यामुळे वंचितकडून नगराध्यक्ष पदासाठी अर्ज भरण्यासाठी तयार नसल्याची माहिती मिळत आहे. त्यामुळे अगदी शेवटच्या क्षणात नितूने नावाच्या महिला उमेदवाराचा वंचितकडून नगराध्यक्ष पदासाठी अर्ज सादर करण्यात आला (आज छाननी दरम्यान तो अर्ज सुद्धा बाद झाला आहे). याचप्रमाणे जिल्ह्यात जवळपास सगळ्याच ठिकाणी वंचित आणि काँग्रेस या युती पक्षाकडून नगराध्यक्ष पदासाठी अर्ज दाखल करण्यात आले. त्यामुळे युती असतानाही दोन्ही पक्षाकडून अर्ज दाखल झाल्याने दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यात आणि मतदारांमध्ये काही संभ्रम निर्माण झाला आहे.


काम बंद पडलेला भुयारी मार्ग, आंदोलन/उपोषण आणि वास्तव!

दोन्ही पक्षाकडून अर्ज दाखल झाल्याने ज्या उमेदवाराला अर्ज वरिष्ठांकडून परत घेतला जाईल त्या उमेदवाराची नाराजी ज्यांच्यासाठी आपला अर्ज माघारी घेण्यात आला त्यांच्यावर झाल्याशिवाय राहणार नाही. त्याचा परिणाम तो तन-मन-धनाने युतीतील घटक पक्षाचे काम करणार नाही हे इतके सत्य आहे. परिणामी युती असलेल्या दोन्ही पक्षातील या वादामुळे भाजपच्या उमेदवाराचा विजयाचा मार्ग मोकळा होताना दिसत आहे.

काँग्रेस वंचितच्या युतीच्या घोषणेनंतर दोन्ही पक्षातील कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचे वातावरण होते अनेकांना आपले स्वप्न पूर्ण होताना दिसत होते परंतु नगराध्यक्ष पदाच्या अर्ज भरण्यावरून झालेला गोंधळ नगरसेवक पदावरी परिणाम करणारा दिसून येत आहे त्यामुळे अजूनही दोन्ही पक्षातील वरिष्ठ नेत्यांनी याबाबत योग्य ती खबरदारी घेऊन अर्ज मागे घेण्याच्या दिवशी भाजपची विजय रथ थांबविण्याच्या दृष्टीने योजना आखल्यास चांगला परिणाम येऊ शकतो येणाऱ्या काळात जिल्हा परिषद पंचायत समिती ह्या सुद्धा निवडणूक आहेत त्यामध्ये सुद्धा या चांगल्या युतीचा परिणाम झाल्याशिवाय राहणार नाही परिणामी दोन्ही पक्षातील कार्यकर्त्यांना त्यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांना योग्य त्या निवडणुकीत विजय करता येणे शक्य आहे ज्यामुळे दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये आनंदाची लहर निर्माण होईल तूर्तास एवढेच.

काँग्रेस आणि वंचित यांच्या युतीच्या घोषणेनंतर खामगाव नगर परिषदच्या अध्यक्षपदाच्या उमेदवारासाठी वंचितकडून भाजपच्या जातीय समीकरणात विभाजन होईल अशा कुणबी समाजाच्या बलवान पदाधिकाऱ्यांच्या पत्नीला सदरचे नगराध्यक्ष पदाचा उमेदवार जर घोषित केला असता तर मात्र भाजपचा विजय दृष्टिप्रकाश पडला नसता अशी परिस्थिती निर्माण झाली असती. त्यासाठी लागणारा उमेदवार वंचितकडे आहे. ज्यांना शिक्षक मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली होती त्या प्राध्यापक अमलकार यांच्या पत्नीला नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार म्हणून काँग्रेस-वंचितकडून दिले गेले असते तर मात्र काँग्रेसची, वंचितची आणि उमेदवाराच्या जातीय समीकरणाच्या आधारे सदरचा वंचितचा उमेदवार विजयी झाला असता याची दाट शक्यता असती. परंतु असे न झाल्याने भाजपच्या उमेदवाराच्या विजयाची शक्यता मोठ्या प्रमाणात निर्माण झाली असल्याने काँग्रेस-वंचितच्या युतीचा फायदा भाजपला होत असल्याचे राजकीय विश्लेषकांचे मत आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

हे पण वाचा

khamgaon rajkaran

भाजप ला बौद्ध समाजासह ब्राम्हण समाजाची सुद्धा ऍलर्जी? हिंदुत्ववादी भाजप कडून तीन मुस्लिम उमेदवार रिंगणात तर तिघांसमोर उमेदवार न दिल्याने छुपी युती उघड!

khangaon rrajkaran zp nivadnuk

डॉ. संजय कुटेंना बौद्ध समाजाची एलर्जी पक्षाच्या विद्यमान नगरसेविका सुषमा नितीन शेगोकार यांना डावलून जाणीवपूर्वक नवख्या आशिष सावळे यांना दिली उमेदवारी -बौद्ध समाजात संतापाची लाट!

khamgaon election

प्रखर प्रहार ब्रेकिंग: भाजप ची नगराध्यक्षा निवडून यावी यासाठीच काँग्रेसची जागा वंचितला का?

rajkaran

शहरातील राजकारण नीच पातळीला; पती-पत्नीच्या पवित्र नात्याचा सत्तेसाठी दिला जातोय बळी!

congress vanchit yuti

काँग्रेस-वंचित युतीने राजकारणाचे पासे पलटण्याची शक्यता; शिंदे गट सामील झाल्यास सत्ताधाऱ्यांना मोठा धक्का!

congress vanchit yuti khamgaon

काँग्रेस-वंचित युती कार्यकर्त्यांना राजकीय जीवनदान देणारी; शिवसेना शिंदे गट सामील झाल्यास ३० वर्षांपासून शहर गाजवणाऱ्यांना लगाम!

1 thought on “काँग्रेस-वंचित युती भाजपच्या पथ्यावर? दोन्ही पक्षांनी अर्ज दाखल केल्याने विजयात अडथळा, भाजपचा मार्ग मोकळा!”

Leave a Comment

WhatsApp Join Group!