हवामानबाजारभावशासन निर्णयनिवडणूकक्राईमनोकरीयोजनाफायनान्सलाइफस्टाइलगुंतवणूकऑटोएआयखेळआध्यात्मिकसिनेमा

ब्रेकिंग
स्व. संजय ठाकरे पाटील यांची जयंती विविध कार्यडॉ. संजय कुटेंना बौद्ध समाजाची एलर्जी पक्षाचखामगावच्या ज्येष्ठ पत्रकार मोहम्मद फारूक यानिष्ठावंत कार्यकर्ते अमोल अंधारे यांची पक्षबुलडाणा बसस्थानकावर डॉ. बाबासाहेब आंबेडकर याराष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे मोहनराव पाटी

धम्मदीप बुद्धविहार कोथळी येथे रामजी सपकाळ यांची जयंती उत्साहात साजरी

On: November 15, 2025 6:10 PM
Follow Us:
ramji sapkal jayanti kothali

मोताळा (विजय दोडेप्रखर प्रहार): धम्मदीप बुद्धविहार कोथळी येथे रामजी सपकाळ यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. प्रथम ज्येष्ठ उपासक पंढरी सावळे, धर्माजी वाघोदे, उपासिका गंगाबाई सावळे, ताईबाई सावळे, निर्मला सावळे यांच्याकडून अधिष्ठानाचे पूजन करण्यात आले. नंतर सामूहिक त्रिशरण-पंचशील घेऊन कार्यक्रमाची सुरुवात झाली.

धम्म उपासक सोपान सावळे (भा.बौ. महासभा संस्कार सचिव) यांनी मनोगतात म्हटले की, “रामजी बाबांनी आपल्या मुलाला म्हणजे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना घडविण्यासाठी त्याच्या मनात पेटवलेली शिक्षणाची ज्योत आज बाबासाहेबांच्या रूपाने संपूर्ण जगाला प्रकाश देत आहे.”

समाजात बाबासाहेबांसारखे विद्यार्थी घडविण्यासाठी प्रत्येक घरात रामजी बाबांप्रमाणे कष्ट करावे लागतील आणि त्यासाठी प्रत्येकाला दर रविवारी बुद्धविहारात यावेच लागेल, असे आव्हान धम्म उपासक युवराज भिडे यांनी आपल्या मनोगतात केले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन महेंद्र धुरंधर यांनी केले, तर आभार विनोद सावळे यांनी मानले. कार्यक्रमाला बहुसंख्याने उपासक, उपासिका, बालक-बालिका व युवा पैलवान ग्रुपचे सदस्य उपस्थित होते. निनाजी सुरळकर यांनी खीर दान करून धम्म पालन गाथेने कार्यक्रम संपन्न झाला.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

हे पण वाचा

झाडेगाव : डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त स्मारकाला हार अर्पण; विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप व वृक्षारोपण

खामगाव – डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त स्वाभिमानी आंबेडकरवादी अधिकारी व कर्मचारी ग्रुपने भीम अनुयायांसाठी एक उपयुक्त सेवा पुरवली.

नांदुरा – डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त केवळ जल्लोष न करता, ज्ञानप्रसार आणि गरजू विद्यार्थ्यांना मदत करण्याचा स्तुत्य उपक्रम ‘सद् धम्म प्रबोधन आणि विपश्यना प्रशिक्षण ट्रस्ट’ने राबवला. नांदुरा येथे आयोजित कार्यक्रमात आदिवासी विद्यार्थ्याला आर्थिक मदत, महिलांना मोफत ग्रंथवाटप आणि पत्रकारांचा सन्मान यातून बाबासाहेबांच्या विचारांचा खरा वारसा साजरा करण्यात आला.

बुलडाणा बसस्थानकावर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या पूर्वसंधेला माता भिमाई व बाबासाहेबांना अभिवादन

वरोरा – आनंद निकेतन महाविद्यालय, आनंदवन येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात उपप्राचार्य डॉ. गोपाल वरुटकर यांनी अध्यक्षस्थान भूषवले तर प्रा. डॉ. नरेंद्र पाटील (अर्थशास्त्र विभाग प्रमुख) हे प्रमुख वक्ते म्हणून उपस्थित होते. प्रा. नीरज आत्राम (राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी) यांचीही प्रमुख उपस्थिती लाभली.

डोंबिवलीत जनजागृती सेवा संस्थेच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३५वी जयंती उत्साहात साजरी

Leave a Comment