खामगांव (प्रखर प्रहार): भाजप हा हिंदूधार्जिण पक्ष आहे हे एकदा पुन्हा शेगाव नगर परिषदच्या निवडणुकीत सिद्ध होताना दिसून येत आहे. नगर परिषदचे अध्यक्ष पद मागासवर्गीय राखीव निघाल्याने शहरात मोठ्या प्रमाणावर असलेल्या बौद्ध समाजाला यावेळी तरी भाजपकडून आ. संजय कुटे यांचे खंदे समर्थक म्हणून ओळखले जाणारे आणि ज्यांना समाजाने अनेक पुरस्काराने सन्मानित केले असे विद्यमान नगरसेविका सुषमा शेगोकार यांचे पती नितीन शेगोकार यांना संधी मिळेल अशी सर्व समाज बांधवांची अपेक्षा होती परंतु इथे पण जातीयवाद आडवा आला असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. शेवटच्या क्षणात भाजपकडून मातंग समाजाच्या नवख्या आशिष सावळे यांना उमेदवारी देण्यात आली.
आ. कुटे यांच्या निवडणुकीच्या वेळी याच नितीन शेगोकार यांचा वापर करून बौद्ध समाजाचे मतदान मिळविले होते. निष्ठावान म्हणून मोठी मेहनत नितीन शेगोकारांनी केली आणि पक्षाला जास्तीत जास्त मतदान मिळवून देण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला. अर्थात आ. कुटे मंत्री असताना त्यांनी सुद्धा भरपूर निधी मागासवर्गीयांसाठी दिला हे पण तितकेच खरे आहे. पण त्यामुळे फक्त निधी मागा हक्क मागू नका असे तर एक प्रकारे भाजपकडून सुचविले जात नाही ना असा प्रश्न बौद्ध समाजाला पडला आहे.
आम्रपाली नगरमध्ये कालकथित रवी शेगोकार यांच्या संकल्पनेतील बौद्ध विहाराचे निर्माण केले गेले होते त्याच परिसरात मोठ्या प्रमाणात बौद्ध समाजाचे वास्तव्य आहे. त्याठिकाणी नितीन शेगोकार यांच्या माध्यमातून आ. कुटे यांनी निधी देऊन दोन मजली बौद्ध विहारची निर्मिती करण्यात आली त्या वास्तूच्या लोकार्पण सोहळ्याच्या भाषणातून कुटे यांनी बौद्ध समाजासोबत जुडलेली नाळ आणि रवी शेगोकार नितीन शेगोकार हे माझे भाऊ आहेत अशा प्रकारचे भाषण दिले असल्याची माहिती मिळत असून प्रत्यक्षात मात्र जेव्हा त्याच भावाला हक्क मिळवून देण्याची वेळ आली तेव्हा मात्र आ. कुटे यांनी मागासवर्गीय समाजातील घटक परंतु अत्यंत कमी मतदान असलेल्या मातंग समाजाला प्राधान्य देऊन तुम्ही फक्त निधी मागण्यासाठी आहात हक्क मागण्यासाठी नाही असाच काहीसा प्रकार घडल्याची चर्चा बौद्ध समाज बांधव करताना दिसत आहेत.
चौकट…
वंचित आणि काँग्रेसच्या युतीकडून विद्यमान नगरसेविका प्रीती राजेंद्र शेगोकार यांना उमेदवारी देण्यात आली आहे. प्रीती शेगोकार या या आधी सुद्धा निवडणूक रिंगणातून विजयी झालेल्या असल्याने त्यांचे पारडे भाजपच्या उमेदवारापेक्षा जड असल्याचे चित्र आहे. त्यामुळेच की काय युती असलेल्या काँग्रेसने सुद्धा आपल्या पक्षाच्या वतीने चांभार समाजाच्या वतीने उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला आहे. वास्तविक पाहता युती असताना आणि सदरची जागा वंचितला सुटली असताना काँग्रेसकडून अर्ज दाखल करण्याची गरजच नव्हती. काँग्रेसने आपल्या उमेदवाराने भरलेला अर्ज मागे घेऊन वंचितच्या उमेदवाराचा सर्वपरीने प्रचार केल्यास सत्ताधाऱ्यांची झोप उडल्याशिवाय राहणार नाही. एवढे मात्र नक्की.











1 thought on “डॉ. संजय कुटेंना बौद्ध समाजाची एलर्जी पक्षाच्या विद्यमान नगरसेविका सुषमा नितीन शेगोकार यांना डावलून जाणीवपूर्वक नवख्या आशिष सावळे यांना दिली उमेदवारी -बौद्ध समाजात संतापाची लाट!”