खामगांव (प्रखर प्रहार): खामगांव येथील माखरीया नगरात लहुजी विद्रोही सेना खामगांवच्या वतीने आद्य क्रांतिगुरू लहुजी वस्ताद साळवे यांची १३१वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. यानिमित्त पुष्पहार अर्पण, दीपप्रज्वलन आणि भोजन समारंभाचे आयोजन करण्यात आले.
खामगांव शहरातील बसस्थानकावर आद्य क्रांतिगुरू लहुजी वस्ताद साळवे यांची प्रतिमा लावण्यात आली. तसेच माखरीया नगर येथील राजश्री छत्रपती शाहू महाराज शाळा क्रमांक १० मध्ये शालेय विद्यार्थ्यांना पेन्सिल आणि खोडरबर वाटप करण्यात आले. विविध माध्यमांतून कार्यक्रम घेण्यात आले.
कार्यक्रमाला लहुजी विद्रोही सेना बुलढाणा जिल्हाध्यक्ष मा. रुपेश भाऊ अवचार, सागर अवसरमोल, आकाश गायकवाड, हरिभाऊ अवचार, नामदेव अवचार, अनिल शेलारकर, विठ्ठल आवळे, शुभम शेलार, सचिन अवचार, कपिल अवचार, ओम अवचार, करण अवचार, वैभव बोरकर तसेच मातंग समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.











