खामगांव (प्रखर प्रहार): शहरातील राजकारण नीच पातळीला पोहोचले असून, काही स्थानिक नेत्यांनी स्वार्थासाठी पती-पत्नीच्या पवित्र नात्यालाही राजकीय डावपेचाचा साधन बनवले आहे. आपले पारडे जड करण्यासाठी हे नेते पतीला आमिष किंवा धमक्या देऊन त्याच्या पत्नीच्या निर्णयाविरुद्ध उभे करत आहेत. अगदी “माझ्या पत्नीचे अपहरण झाले” अशी खोटी तक्रार दाखल करण्यास भाग पाडण्यापर्यंत मजल मारली जात आहे.
कोणतीही पत्नी आपल्या पतीच्या निर्णयाविरुद्ध राजकारण करत नाही, हे त्रिवार सत्य आहे. तरीही राजकीय स्वार्थासाठी या पवित्र नात्यात कायमचा दुरावा निर्माण करणे कितपत योग्य? असा प्रश्न उपस्थित होत आहे. अशा नीच राजकीय डावपेचांना जनतेने कायमचा धडा शिकवणे गरजेचे असल्याचे मत व्यक्त होत आहे.










