नगराध्यक्ष पदाचे दावेदार असलेल्या ब्राम्हण समाजाला गृहीत धरल्याने नाराज ब्राम्हण समाजाच्या भूमिकेकडे जनतेचे लक्ष!
नगराध्यक्ष पद हे सर्वसाधारण महिला निघाल्याने ओपन मधील सर्वच पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण होते. मागच्या वेळी हेच नगराध्यक्ष पद मागासवर्गीय महिला राखीव असल्याने अनेकांचे स्वप्न भंग झाले होते. अनेकांची इच्छा असतांना सुद्धा राखीव निर्णयामुळे कार्यकर्त्यांचा हिरमोड झाला होता. ते सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते नगराध्यक्ष पदाच्या आरक्षण सोडतीकडे लक्ष लावून बसलेले होते.त्यातच नगराध्यक्ष पदाचे आरक्षण सर्वसाधारण महिला निघाल्याने प्रत्येक पक्ष आपल्याला संधी देईन असे वाटतं होते. सत्ताधारी भाजप कडून अनेक दिग्गज आस लावून बसले होते मागील वेळी मागासवर्गीय निघाल्याने सर्वसाधारण पदाधिकारी दहा वर्षांपासून वाट पाहत असलेले होते.
सन 2000 मध्ये जनतेतून नगराध्यक्ष निवडीचा सर्वात पहिल्या प्रयोगाच्यावेळी भाजपा कडून पहिल्यांदा सुभाषराव देशपांडे यांना उमेदवारी दिल्या गेली होती. सर्वसाधारण जागेवर ब्राम्हण समाजाला उमेदवारी दिल्याने समाजात उत्साहाचे वातावरण होते. त्यानंतर मात्र कधीच ब्राह्मण समाजाला संधी देण्यात आली नाही. इतकेच काय तर नगरसेवक पदासाठी सुद्धा ब्राह्मण समाजाच्या मोजक्याच लोकांना संधी देण्यात आली आहे.
भाजप हा हिंदुत्ववादी पक्ष म्हणून परिचित आहे. त्यांनी भाजप च्या समर्थनात असलेल्या ब्राह्मण समाजाला आज पर्यंत मोजके नगरसेवक उमेदवार देवून भाजप विरोधी ओरळ करणाऱ्या मुस्लिम समाजाच्या तीन लोकांना “कमळ” या निशाणीवर उभे केले असल्याची माहिती मिळत असून तीन मुस्लिम उमेदवाराच्या विरुद्ध भाजप ने उमेदवार दिले नसल्याची सुद्धा माहिती मिळत आहे.बौद्ध समाजाच्या एकाही कार्यकर्त्याला संधी देण्यात आली नसल्याने भाजप चा चेहरा उघडा पडला आहे. जो ब्राह्मण समाज भाजपचा कट्टर समर्थक आहे त्यांना जर भाजप कडून मोजक्या ठिकाणी संधी देण्यात येते तर बौद्ध समाजाला संधी देण्याचा प्रश्नच उद्भवत नाही.
भाजप जर हिंदुत्ववादी म्हणून आपली ओळख दाखवत असेल तर मात्र ब्राम्हण समाजाला सर्वसाधारण निघालेल्या आरक्षणात अध्यक्षपदाची उमेदवारी देणे अपेक्षित होते. सर्वसाधारण आरक्षण निघाल्याने एस. सी. एस. टी. ओबीसी. यांच्या व्यतिरिक्त असलेल्या अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना अपेक्षा होती. परंतु सर्वसाधारण जागेवर सुद्धा ओबीसी कॅटेगिरी असलेल्या फुंडकर परिवारातून अर्ज दाखल केल्याने आश्चर्य व्यक्त होऊन अनेक कार्यकर्ते आणि पदाधिकारी यांच्यावर एक प्रकारे अन्यायचं झाला असे म्हणल्यास वावगे ठरणार नाही.
अनेक निष्ठावंत कार्यकर्त्यांना दे धक्का.
नगराध्यक्ष पद जर ओबीसी निघाले असते तर नक्कीच आज दिलेला उमेदवार हा सर्वांनीच सन्मान पूर्वक स्वीकारला असता कुणीही नाराज किंवा हरकत घेण्याचे काहीच कारण उरले नसते परंतु नगराध्यक्ष पद हे सर्वसाधारण महिला निघाल्याने साहजिकच ओपन कॅटेगिरी मधील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना आपल्याला नक्कीच न्याय मिळेल अशी अपेक्षा होती.त्यातच भाजप सोबत खांद्याला खांदा लावून काम करणाऱ्या हिंदी भाषिक मुन्ना पुरवार सारख्या निष्ठावंत पदाधिकाऱ्याला नगराध्यक्ष पद तर नाहीच साधे नगरसेवक म्हणून सुद्धा उमेदवारी दिली नसल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.मागील पाच वेळा मुन्ना पुरवार हे नगर सेवक म्हणून निवडून आल्या नंतर सुद्धा त्यांना सन्मान मिळत नसेल तर मात्र भाजप कडून अश्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा वापरच केल्या गेला असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. आता ही निष्ठावंत मंडळी काय निर्णय घेते याकडे जनतेचे लक्ष लागले आहे.
आता हे निष्ठावंत मंडळी कोणता निर्णय घेतात, याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.










