पुणे (प्रतिनिधी – जगदीप वनशिव): पाचवे राज्यस्तरीय भीमथडी मराठी साहित्य संमेलन येत्या शनिवार, दि. २३ मे आणि रविवार, दि. २४ मे २०२६ रोजी केडगाव, चौफुला, तालुका दौंड, जिल्हा पुणे येथील श्री बोरमलनाथ मंदिर परिसरात भव्य रूपात आयोजित करण्यात येणार आहे.
संमेलनात उद्घाटन समारंभ, पुरस्कार वितरण, ग्रंथदिंडी, परिसंवाद, प्रकट मुलाखत, कथाकथन, नाट्यप्रयोग, सांस्कृतिक कार्यक्रम आणि कविसंमेलन असे विविध आणि भरगच्च कार्यक्रम ठेवण्यात आले आहेत. ही माहिती संमेलनाचे मुख्य प्रवर्तक व ज्येष्ठ साहित्यिक दशरथ यादव यांनी दिली.
अखिल भारतीय मराठी साहित्य संशोधन परिषद आणि भीमथडी मराठी साहित्य प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने दरवर्षी हे संमेलन आयोजित केले जाते. यावर्षीच्या संमेलनाच्या तयारीसाठी झालेल्या बैठकीला भीमथडी मराठी साहित्य प्रतिष्ठानचे अध्यक्ष संजय सोनवणे, उपाध्यक्ष बाळासाहेब मुळीक, सचिव दीपक पवार, कैलास शेलार, राजाभाऊ जगताप, रामचंद्र नातू, महाराष्ट्र राज्य तमाशा थिएटर मालक संघटनेचे अध्यक्ष डॉ. अशोकराव जाधव, डॉ. बाबासाहेब आंबेडकर प्रतिष्ठानचे अध्यक्ष विनायक कांबळे, झोपडपट्टी सुरक्षा दल पुणे जिल्हा अध्यक्ष दत्तात्रय डाडर, रानकवी जगदीप वनशिव, संदीप सोनवणे, रविंद्र खोरकर, भाऊसाहेब फडके, नितिन भागवत, आनंदा बारवकर, सुशांत जगताप, अरविंद जगताप आदी मान्यवर उपस्थित होते.
दोन दिवस चालणाऱ्या या साहित्य संमेलनात सहभागी होणाऱ्या कवी, लेखक, कलावंत आणि साहित्यिकांसाठी मुक्काम आणि जेवणाची व्यवस्था मोफत करण्यात आली आहे. संमेलनात कसलेही शुल्क आकारले जाणार नाही.
साहित्य संमेलनात सहभागी होण्यासाठी इच्छुक कवी, लेखक, कलावंत आणि साहित्यिकांनी खालील क्रमांकावर संपर्क साधावा :
- ९८८१०९८४८१
- ८८०५५११०६०
- ९८५०२०६९७७
- ८८८८४१०३३०
भीमथडी मराठी साहित्य प्रतिष्ठानचे अध्यक्ष व पत्रकार-कवी-गीतकार संजय सोनवणे व सचिव दीपक पवार यांनी सर्व साहित्यप्रेमींना या संमेलनात मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन केले आहे.
(प्रखर प्रहार न्यूज नेटवर्क)










