हवामानबाजारभावशासन निर्णयनिवडणूकक्राईमनोकरीयोजनाफायनान्सलाइफस्टाइलगुंतवणूकऑटोएआयखेळआध्यात्मिकसिनेमा

ब्रेकिंग
खामगाव: पिंपळगाव राजा येथील प्राचीन शिव मंदिकेला हिंदी हायस्कूलचा मनमानी कारभार, गल्लीतीकेंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांची खामगांखामगाव : टॉवर चौकात विहिंप, बजरंग दल आणि सकल हि५ वे भीमथडी मराठी साहित्य संमेलन २३ आणि २४ मे जिल्हा शल्य चिकित्सक झोपला की काय? नियम पायदळ

झाडेगाव : डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त स्मारकाला हार अर्पण; विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप व वृक्षारोपण

On: April 18, 2026 4:22 PM
Follow Us:

झाडेगाव : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त ग्राम झाडेगाव येथे एक सार्थ कार्यक्रम आयोजित करण्यात आला. या प्रसंगी डॉ. आंबेडकरांच्या स्मारकाला हार अर्पण करून श्रद्धांजली वाहण्यात आली.

यावेळी ग्रामस्थ शाळेतील विद्यार्थ्यांना शालेय उपयोगी साहित्याचे वाटप करण्यात आले. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाजवळ तसेच शाळेच्या परिसरात पर्यावरण संरक्षणासाठी वृक्षारोपण करण्यात आले. या उपक्रमामुळे पर्यावरणाबाबत जागरूकता निर्माण होण्यास मदत होईल, असे मान्यवरांनी सांगितले.

कार्यक्रमाला वंचित बहुजन आघाडीचे नेते ॲड. संदीपभाऊ उगले, राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे नेते श्री. विश्वासराव पाटील, शिवसेना नेते मेजर वसंतराव मिरगे, लोकनियुक्त सरपंच रामरतन भाऊ चोपडे, वंचित बहुजन युवक आघाडीचे रोशन भाऊ तायडे, उपसरपंच उषाताई भोंडोकार, ग्रामपंचायत सदस्य दत्ताभाऊ काळंगे, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष प्रफुल्ल भाऊ तायडे, शाळेचे मुख्याध्यापक श्री. रवींद्र मेहेंगे सर, श्री. गयी सर, आनंद गवई, रवींद्र तायडे, चंद्रकांत गावंडे, ग्रामपंचायत सदस्य मनोहर तायडे, अनंता भाऊ चोपडे, संदीप भाऊ तायडे, वैभव वानखडे आदी मान्यवर उपस्थित होते.

या कार्यक्रमात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा प्रचार आणि पर्यावरण रक्षणाचा संदेश एकत्रितपणे देण्यात आला. सर्व उपस्थितांनी विद्यार्थ्यांना प्रोत्साहन दिले आणि भविष्यात असे उपक्रम अधिक चांगल्या पद्धतीने राबवण्याचे आवाहन केले.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

हे पण वाचा

पिंपळगाव राजा येथील गांजा प्रकरणात तपास अधिकारी दिवसभर गायब; बारा तास होऊन ही गुन्हा दाखल नाही. पत्रकारांसोबत हुज्जत करणाऱ्या एपिआय मुंढे वर कारवाई होणार का?

मुख्याधिकारी, ठेकेदार आणि महावितरणच्या हलगर्जीपणामुळे समीरचा शॉक लागून मृत्यू – आरोप ” मोदी “च्या राज्यात “मनोज” म्हणतो माझे कुणीच काही करू शकत नाही “पोलीस माझ्या खिश्यात”!

चिमुरडीवर अत्याचार करणाऱ्यांना चौकात फाशी द्या; कांबळ्यापासून सुरुवात करावी

खामगाव : टॉवर चौकात विहिंप, बजरंग दल आणि सकल हिंदू समाजाच्या वतीने प्रखर निषेध आंदोलन

खामगाव – डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त स्वाभिमानी आंबेडकरवादी अधिकारी व कर्मचारी ग्रुपने भीम अनुयायांसाठी एक उपयुक्त सेवा पुरवली.

नांदुरा – डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त केवळ जल्लोष न करता, ज्ञानप्रसार आणि गरजू विद्यार्थ्यांना मदत करण्याचा स्तुत्य उपक्रम ‘सद् धम्म प्रबोधन आणि विपश्यना प्रशिक्षण ट्रस्ट’ने राबवला. नांदुरा येथे आयोजित कार्यक्रमात आदिवासी विद्यार्थ्याला आर्थिक मदत, महिलांना मोफत ग्रंथवाटप आणि पत्रकारांचा सन्मान यातून बाबासाहेबांच्या विचारांचा खरा वारसा साजरा करण्यात आला.

Leave a Comment