हवामानबाजारभावशासन निर्णयनिवडणूकक्राईमनोकरीयोजनाफायनान्सलाइफस्टाइलगुंतवणूकऑटोएआयखेळआध्यात्मिकसिनेमा

ब्रेकिंग
खामगांवमध्ये आद्य क्रांतिगुरू लहुजी वस्ताद पिंपळगाव राजा येथील गांजा प्रकरणात तपास अधिककाँग्रेस-वंचित युतीने राजकारणाचे पासे पलटण्खामगावात क्रीडा क्रांती! युगधर्म पब्लिक स्कूओमसाई फाउंडेशनने गेल्या वर्षी ८० हून अधिक अपखामगाव तालुक्यात पिसाळलेल्या कुत्र्याची दह

खामगाव : टॉवर चौकात विहिंप, बजरंग दल आणि सकल हिंदू समाजाच्या वतीने प्रखर निषेध आंदोलन

On: April 18, 2026 4:33 PM
Follow Us:

खामगाव येथील टॉवर चौकात देशात वाढत असलेल्या चिंताजनक सामाजिक घटनांविरोधात विश्व हिंदू परिषद, बजरंग दल आणि सकल हिंदू समाजाने एकत्र येऊन जनआक्रोश व्यक्त केला. या आंदोलनात समाजातील शांतता आणि सुरक्षितता अबाधित ठेवण्यासाठी कठोर कायदे करण्याची आणि त्यांची प्रभावी अंमलबजावणी करण्याची मागणी करण्यात आली.

आंदोलनादरम्यान कार्यकर्त्यांनी विकृत जिहादी मानसिकता, लव्ह जिहाद, जबरदस्तीने धर्मांतर, हिंदू मुलींवर होणारे शारीरिक व मानसिक शोषण तसेच सार्वजनिक आणि सरकारी जमिनींवर होणारे अवैध अतिक्रमण या मुद्द्यांवर तीव्र नाराजी व्यक्त केली. अशा घटनांमुळे समाजात अस्वस्थता वाढत असल्याचे सांगत, यावर कायद्याद्वारे तातडीने नियंत्रण आणण्याची गरज असल्याचे मत मांडण्यात आले.

“समाजातील शांतता, सुरक्षा आणि सद्भाव टिकवण्यासाठी कडक कायद्याची कठोर अंमलबजावणी आवश्यक आहे,” असे हिंदुसेवक अमोल अंधारे यांनी यावेळी स्पष्ट केले. कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करत दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली. यासोबत शासनाने ठोस कायदे तयार करून अशा समाजविघातक प्रवृत्ती रोखण्यासाठी मजबूत यंत्रणा उभी करावी, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली.

आंदोलनात संतप्त कार्यकर्त्यांनी दोषींचा प्रतिकात्मक पुतळा जाळून आपला तीव्र निषेध नोंदवला. या माध्यमातून समाजातील जनआक्रोश स्पष्टपणे दिसून आला.

या कार्यक्रमाला विश्व हिंदू परिषदेचे जिल्हाध्यक्ष राजू भाऊ झापर्डे, जिल्हा मंत्री राजूभाऊ राजपूत, हिंदुसेवक अमोल अंधारे, बजरंग दलाचे नगर संयोजक शुभम मुधोळकर यांची प्रमुख उपस्थिती होती. विविध हिंदुत्ववादी संघटना, राजकीय पक्ष, मातृशक्ती दुर्गा वाहिनीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. नागरिकांनीही उत्स्फूर्त प्रतिसाद देत आंदोलनाला पाठिंबा दिला.

आंदोलनाच्या माध्यमातून शासनाकडे एकमुखी मागणी करण्यात आली की, समाजातील अशा घटनांवर तातडीने कठोर उपाययोजना कराव्यात आणि भविष्यात अशा प्रकारचे प्रकार घडू नयेत यासाठी आवश्यक ते पावले उचलावेत.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

हे पण वाचा

पिंपळगाव राजा येथील गांजा प्रकरणात तपास अधिकारी दिवसभर गायब; बारा तास होऊन ही गुन्हा दाखल नाही. पत्रकारांसोबत हुज्जत करणाऱ्या एपिआय मुंढे वर कारवाई होणार का?

मुख्याधिकारी, ठेकेदार आणि महावितरणच्या हलगर्जीपणामुळे समीरचा शॉक लागून मृत्यू – आरोप ” मोदी “च्या राज्यात “मनोज” म्हणतो माझे कुणीच काही करू शकत नाही “पोलीस माझ्या खिश्यात”!

चिमुरडीवर अत्याचार करणाऱ्यांना चौकात फाशी द्या; कांबळ्यापासून सुरुवात करावी

झाडेगाव : डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त स्मारकाला हार अर्पण; विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप व वृक्षारोपण

बुलडाणा बसस्थानकावर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या पूर्वसंधेला माता भिमाई व बाबासाहेबांना अभिवादन

डोंबिवलीत जनजागृती सेवा संस्थेच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३५वी जयंती उत्साहात साजरी

Leave a Comment