हवामानबाजारभावशासन निर्णयनिवडणूकक्राईमनोकरीयोजनाफायनान्सलाइफस्टाइलगुंतवणूकऑटोएआयखेळआध्यात्मिकसिनेमा

ब्रेकिंग
स्व. संजय ठाकरे पाटील यांची जयंती विविध कार्ययुगधर्म पब्लिक स्कूल खामगाव येथे CBSE दहावीचा सधम्मदीप बुद्धविहार कोथळी येथे रामजी सपकाळ याकाँग्रेस-वंचित युतीने राजकारणाचे पासे पलटण्खामगाव : टॉवर चौकात विहिंप, बजरंग दल आणि सकल हिओमसाई फाउंडेशनने गेल्या वर्षी ८० हून अधिक अप

काँग्रेस-वंचित युतीने राजकारणाचे पासे पलटण्याची शक्यता; शिंदे गट सामील झाल्यास सत्ताधाऱ्यांना मोठा धक्का!

On: November 15, 2025 6:23 PM
Follow Us:
congress vanchit yuti

खामगांव (प्रखर प्रहार): काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडी युतीने स्थानिक राजकारणात खळबळ माजवली असून, महायुतीतील घटकपक्ष शिवसेना शिंदे गटाला अपेक्षित मान-सन्मान न मिळाल्याने स्थानिक नेत्यांमध्ये प्रचंड नाराजी निर्माण झाली आहे. शिंदे गटाच्या एका छोट्या गटाला भाजप जवळ आणण्याचा प्रयत्न होत असला, तरी मोठा गट नाराज असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

खासदार ना. प्रतापराव जाधव यांनी शिंदे गटाच्या स्थानिक नेत्यांना दिलेली ताकद आणि सामान्य नागरिकांच्या समस्या सोडवण्यातील यश यामुळे तरुणांचा कल शिंदे गटाकडे वाढत आहे. याचा चटका भाजपच्या काही पदाधिकाऱ्यांना बसत असून, दोन्ही पक्षातील पदाधिकाऱ्यांमध्ये वैचारिक मतभेद कमालीचे वाढले आहेत.

शिंदे गटाचे तालुका अध्यक्ष राजू बघे यांनी संपर्कातील अनेक तरुणांना पक्षात प्रवेश देऊन धडाका लावला आहे. यामुळे पक्षनेत्यांना त्यांची दखल घेणे आणि त्यांचे निर्णय मान्य करणे भाग पडत आहे.

काँग्रेस-वंचित युतीत शिंदे गट सामील झाल्यास ही आघाडी अधिक मजबूत होऊन सत्ताधाऱ्यांना अडचणीत आणू शकते. इतकेच नव्हे, तर गेल्या ३० वर्षांपासून शहराचे राजकारण काही साथीदारांसह हाती ठेवून मनमानी करणाऱ्यांच्या हातून सत्तेच्या दोऱ्या कापण्यात यश मिळू शकते. यामुळे सर्व पक्षातील दुसऱ्या फळीतील नेत्यांना मोठी संधी उपलब्ध होणार आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

हे पण वाचा

पिंपळगाव राजा येथील गांजा प्रकरणात तपास अधिकारी दिवसभर गायब; बारा तास होऊन ही गुन्हा दाखल नाही. पत्रकारांसोबत हुज्जत करणाऱ्या एपिआय मुंढे वर कारवाई होणार का?

नांदुरा – डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त केवळ जल्लोष न करता, ज्ञानप्रसार आणि गरजू विद्यार्थ्यांना मदत करण्याचा स्तुत्य उपक्रम ‘सद् धम्म प्रबोधन आणि विपश्यना प्रशिक्षण ट्रस्ट’ने राबवला. नांदुरा येथे आयोजित कार्यक्रमात आदिवासी विद्यार्थ्याला आर्थिक मदत, महिलांना मोफत ग्रंथवाटप आणि पत्रकारांचा सन्मान यातून बाबासाहेबांच्या विचारांचा खरा वारसा साजरा करण्यात आला.

बुलडाणा बसस्थानकावर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या पूर्वसंधेला माता भिमाई व बाबासाहेबांना अभिवादन

खामगाव – आत्मसन्मान फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष डॉ. विजय पाटील आणि त्यांच्या पत्नी शुभांगी पाटील या दांपत्याला बहुजन उद्धारक सेवा समिती, मलकापूर यांच्या वतीने ‘फुले दांपत्य २०२६’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

खामगावकरांचे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना सकाळी ६ वाजता अनोखे अभिवादन

खामगाव : डॉ. प्रवीणभाई तोगडिया यांचे हिंदुत्ववादी संघटनांच्या वतीने भव्य स्वागत; संघटित हिंदू समाजाची गरज अधोरेखित

Leave a Comment