हवामानबाजारभावशासन निर्णयनिवडणूकक्राईमनोकरीयोजनाफायनान्सलाइफस्टाइलगुंतवणूकऑटोएआयखेळआध्यात्मिकसिनेमा

ब्रेकिंग
खामगाव : टॉवर चौकात विहिंप, बजरंग दल आणि सकल हिचिमुरडीवर अत्याचार करणाऱ्यांना चौकात फाशी दखामगाव : डॉ. प्रवीणभाई तोगडिया यांचे हिंदुत्वपारस एफजीडी प्रकल्पातील वाहन चालकांच्या आंदखामगावकरांचे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना सका५ वे भीमथडी मराठी साहित्य संमेलन २३ आणि २४ मे

खामगाव: पिंपळगाव राजा येथील प्राचीन शिव मंदिरात शिवमहापुराण कथेचे भव्य आयोजन

On: April 14, 2026 1:29 PM
Follow Us:

खामगाव तालुक्यातील पिंपळगाव राजा येथे असलेल्या पुरातन शिव मंदिरात (देवळावाले) यावर्षी शिवमहापुराण कथेचे विशेष आयोजन करण्यात आले आहे. ही कथा १६ एप्रिल २०२६ पासून सुरू होऊन २३ एप्रिल २०२६ पर्यंत चालणार आहे. ह.भ.प. दिलीप महाराज साठे बेलाड यांच्या अमृतवाणीतून ही कथा श्रवणाला येणार असल्याने भाविकांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.

पंचकोशीतील अनेक भाविकांचे श्रद्धास्थान असलेले हे प्राचीन शिव मंदिर वर्षानुवर्षे भक्तांच्या मनात विशेष स्थान बाळगून आहे. परमपूज्य पंचमदास महाराज यांनी येथे नामसप्ताहाची सुरुवात केली होती. त्यानंतर दरवर्षी उन्हाळ्यात नामसप्ताहाचे आयोजन केले जाते. यंदा गावकऱ्यांच्या एकमताने शिवमहापुराण कथेचे संगीतमय स्वरूपात आयोजन ठरविण्यात आले आहे.

कथेचे वाचन सकाळी ८ वाजता सुरू होऊन दुपारी १२ वाजेपर्यंत चालणार आहे. तर संध्याकाळी ८ वाजता भजन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमात संगीत साथ आणि गायनासाठी ह.भ.प. प्रविण महाराज हिवाळे (बुर्टी), ह.भ.प. अरविंदाभाऊ बोंबटकार, ह.भ.प. राजीव खंदारे, ह.भ.प. राहुल महाराज वाकेकर, ह.भ.प. उखर्डा सदाफुले (तबला वादक) यांच्यासह अनेक जाणकार कलाकार सहभागी होणार आहेत.

ऑर्गन वादनासाठी ह.भ.प. महादेव महाराज विटोकार (निमगांव), ऑक्टोपॅडसाठी ह.भ.प. महाराज नांदुरा टाळकरी, तसेच श्री. ह.भ.प. प्रल्हाद सातव, सुधाकर सारभुकन, गजानन बोंबटकार, सुखदेव करागंळे, उमेश बोंबटकार, तुळशिराम वानखडे, राजाराम तायडे, अनंतराव महाले, एकनाथ निमकर्डे, पप्पुभाऊ रायपुरे, परमेश्वर वानखडे, ओम माकोडे, स्वप्निल सातव, बबलु काळे, रामदास वानखडे, श्रीरामभाऊ वानखडे यांच्यासह पंचकोशीतील टाळकरी, विणेकरी आणि महाराज मंडळी यांचे सहकार्य लाभणार आहे.

याशिवाय, २१ एप्रिल २०२६ रोजी संध्याकाळी ७ ते रात्री १० वाजेपर्यंत खंजिरी वादक संदीपपाल महाराज यांचा विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमामुळे कथेच्या सप्ताहाला अधिक रंगत येणार आहे.

पिंपळगाव राजा परिसरातील गावकरी आणि पंचकोशीतील सर्व भाविक नागरिकांनी या शिवमहापुराण कथेत मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सहकार्य करावे, असे आयोजकांच्या वतीने आवाहन करण्यात आले आहे. भक्तिमय वातावरणात ही कथा ऐकण्याची संधी साधून सर्वांनी लाभ घ्यावा.

(प्रखर प्रहार न्यूज नेटवर्क)

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

हे पण वाचा

पिंपळगाव राजा येथील गांजा प्रकरणात तपास अधिकारी दिवसभर गायब; बारा तास होऊन ही गुन्हा दाखल नाही. पत्रकारांसोबत हुज्जत करणाऱ्या एपिआय मुंढे वर कारवाई होणार का?

मुख्याधिकारी, ठेकेदार आणि महावितरणच्या हलगर्जीपणामुळे समीरचा शॉक लागून मृत्यू – आरोप ” मोदी “च्या राज्यात “मनोज” म्हणतो माझे कुणीच काही करू शकत नाही “पोलीस माझ्या खिश्यात”!

चिमुरडीवर अत्याचार करणाऱ्यांना चौकात फाशी द्या; कांबळ्यापासून सुरुवात करावी

खामगाव : टॉवर चौकात विहिंप, बजरंग दल आणि सकल हिंदू समाजाच्या वतीने प्रखर निषेध आंदोलन

झाडेगाव : डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त स्मारकाला हार अर्पण; विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप व वृक्षारोपण

बुलडाणा बसस्थानकावर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या पूर्वसंधेला माता भिमाई व बाबासाहेबांना अभिवादन

Leave a Comment