भिलडोंगर, दि. १४ एप्रिल २०२६ (प्रतिनिधी : विनोद राठोड) : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५व्या जयंतीनिमित्त भिलडोंगर ग्रामपंचायत परिसरात मोठ्या उत्साहाने कार्यक्रम आयोजित करण्यात आला.
ग्रामपंचायत सरपंच चिंतामन खुळे यांच्या अध्यक्षतेखाली डॉ. आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमात सुनिल माळी, गोपाल तुनगर, संतोष, बाबाराव ढंगारे, सुनिल पवार आणि सुधाकर पकमोडे यांनी सक्रिय सहभाग घेतला. उपस्थितांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचे स्मरण करताना समाजात समता, बंधुता आणि न्याय यांचे महत्त्व अधोरेखित केले.
हा संपूर्ण कार्यक्रम ग्रामपंचायत भिलडोंगर यांच्या वतीने आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमात सहभागी झालेल्या सर्व नागरिकांनी डॉ. आंबेडकरांच्या जीवनकार्यापासून प्रेरणा घेण्याचा संकल्प व्यक्त केला.
(प्रखर प्रहार न्यूज नेटवर्क)












