खामगाव – शहरात गेल्या काही वर्षांपासून एक खास परंपरा जोपासली जात आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास सकाळी सहा वाजता भल्या पहाटे मानवंदना देण्याचा उपक्रम. यंदाही आंबेडकरी अनुयायी आणि बहुजन समाजातील नागरिकांनी एकत्र येऊन ही परंपरा कायम राखली.
सोमवारी पहाटे सहा वाजता खामगावमधील आंबेडकर पुतळ्याजवळ मोठ्या संख्येने आंबेडकरी कार्यकर्ते आणि नागरिक जमा झाले. सर्वप्रथम दीप प्रज्वलन करण्यात आले. त्यानंतर डॉ. अनिल एस. वानखडे आणि अंबादास वानखडे यांनी संयुक्तपणे त्रिशरण व पंचशील घेतले. यावेळी सर्व महापुरुषांच्या नावाने जोरदार घोषणा देण्यात आल्या.
पुढे मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले. माजी गटविकास अधिकारी धोंडीराम खंडारे, प्रा. अरविंद शिंगाडे आणि प्रा. डॉ. किशोर वानखडे यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनकार्यावर प्रकाश टाकला. ते म्हणाले की, बहुजन समाजाच्या खऱ्या उद्धारक म्हणून डॉ. आंबेडकर यांचे योगदान अद्वितीय आहे. त्यांच्या विचारांनी समाजाला नवी दिशा दिली आहे.
यावेळी आंबेडकरी चळवळीतील ज्येष्ठ नेते व्ही. एम. भोजने, प्रा. डॉ. एम. आर. इंगळे, धनंजय देशमुख, संघपाल जाधव, पंजाबराव दादा देशमुख, रमेश भाऊ सिरसाट, किरण भाऊ मोरे, अजयभाऊ तायडे, संजय बगाडे, डॉ. तौसिफ रासप, विदर्भ प्रकाश भाऊ दांडगे, प्रा. डॉ. रमेश जी. डोंगरे, कॉम्रेड जितूभाऊ चोपडे, मुरलीधर गुडदे, गजानन दामोदर, गबाजी मुळे, विजय बोदडे, आनंद कस्तुरे, महेंद्र वानखडे, सनी ससाणे, महेंद्र खंडारे, शामभाऊ पाटील, सज्जाद भाई आदींसह असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.
या अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन गौतम गवई, माजी प्राचार्य आनंदराव वानखडे आणि अंबादास वानखडे यांच्या संकल्पनेतून करण्यात आले. उपस्थित सर्वांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा प्रसार करण्याचे आणि समाजातील समता व न्यायाची मूल्ये जोपासण्याचे आवाहन केले.
ही सकाळची मानवंदना आंबेडकरी अनुयायांमध्ये दरवर्षी उत्साहाने पार पडते आणि खामगावकरांच्या एकतेचे प्रतीक बनले आहे.










