हवामानबाजारभावशासन निर्णयनिवडणूकक्राईमनोकरीयोजनाफायनान्सलाइफस्टाइलगुंतवणूकऑटोएआयखेळआध्यात्मिकसिनेमा

ब्रेकिंग
खामगाव – डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतओमसाई फाउंडेशनने गेल्या वर्षी ८० हून अधिक अपचिमुरडीवर अत्याचार करणाऱ्यांना चौकात फाशी दकाम बंद पडलेला भुयारी मार्ग, आंदोलन/उपोषण आणि खामगावच्या ज्येष्ठ पत्रकार मोहम्मद फारूक याबुलडाणा बसस्थानकावर डॉ. बाबासाहेब आंबेडकर या

नांदुरा – डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त केवळ जल्लोष न करता, ज्ञानप्रसार आणि गरजू विद्यार्थ्यांना मदत करण्याचा स्तुत्य उपक्रम ‘सद् धम्म प्रबोधन आणि विपश्यना प्रशिक्षण ट्रस्ट’ने राबवला. नांदुरा येथे आयोजित कार्यक्रमात आदिवासी विद्यार्थ्याला आर्थिक मदत, महिलांना मोफत ग्रंथवाटप आणि पत्रकारांचा सन्मान यातून बाबासाहेबांच्या विचारांचा खरा वारसा साजरा करण्यात आला.

On: April 15, 2026 5:45 PM
Follow Us:

कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण ठरला तो आदिवासी विद्यार्थी राज सुनील चव्हाण. नवोदय विद्यालयात निवड झालेल्या या गुणवंत विद्यार्थ्याचा सत्कार केवळ पुष्पगुच्छ देऊन संपवण्यात आला नाही. ट्रस्टतर्फे त्याला पुढील शिक्षणासाठी १० हजार रुपयांचा धनादेश आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ग्रंथांची भेट देऊन प्रोत्साहन देण्यात आले. या मदतीमुळे राजच्या शिक्षणाच्या प्रवासाला बळ मिळणार आहे, असे उपस्थितांनी सांगितले.

बाबासाहेबांच्या ‘शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा’ या मंत्राला अनुसरून कार्यक्रमात शेकडो महिलांना मोफत पुस्तकांचे वाटप करण्यात आले. तसेच, पत्रकारितेतील बाबासाहेबांच्या योगदानाची आठवण करून देण्यासाठी ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर ग्रंथ खंड २० – पत्रकारिता’ हा विशेष ग्रंथ उपस्थित पत्रकारांना भेट देण्यात आला. कडक उन्हात नागरिकांची सोय व्हावी म्हणून पाणी वाटपाचाही उपक्रम राबवण्यात आला.

ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष संतोषराव तायडे (लोणवाडीकर), प्रशिक्षण केंद्राचे अध्यक्ष गोविंद वाघ, सुखदेव ब्राम्हणे, सोयस्कर सर, दिनकर वाकोडे, राजेश इंगळे, किशोर इंगळे, तोताराम वाकोडे, काशीराम सरदार, सुनील चव्हाण, प्रभाकर इंगळे, भीमराव कळसकार, मुकेश तायडे, अमोल तायडे, नितीन तायडे, सोनटक्के सर, हिवराळे सर, प्रशांत इंगळे आदींसह भीम अनुयायी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

आयोजकांनी सांगितले की, “केवळ हार-तुरे घालून नव्हे तर शिक्षण आणि ज्ञानाचा प्रसार करणे, हीच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना खरी आदरांजली आहे.” हा कार्यक्रम नांदुरा परिसरात ‘ज्ञानाचा जागर’ म्हणून चर्चेत राहिला. ट्रस्टने केलेला हा उपक्रम भविष्यातही समाजातील शेवटच्या व्यक्तीपर्यंत ज्ञान पोहोचवण्याच्या दिशेने प्रेरणादायी ठरेल, असे उपस्थितांनी व्यक्त केले.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

हे पण वाचा

पिंपळगाव राजा येथील गांजा प्रकरणात तपास अधिकारी दिवसभर गायब; बारा तास होऊन ही गुन्हा दाखल नाही. पत्रकारांसोबत हुज्जत करणाऱ्या एपिआय मुंढे वर कारवाई होणार का?

झाडेगाव : डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त स्मारकाला हार अर्पण; विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप व वृक्षारोपण

खामगाव – डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त स्वाभिमानी आंबेडकरवादी अधिकारी व कर्मचारी ग्रुपने भीम अनुयायांसाठी एक उपयुक्त सेवा पुरवली.

बुलडाणा बसस्थानकावर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या पूर्वसंधेला माता भिमाई व बाबासाहेबांना अभिवादन

खामगाव – आत्मसन्मान फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष डॉ. विजय पाटील आणि त्यांच्या पत्नी शुभांगी पाटील या दांपत्याला बहुजन उद्धारक सेवा समिती, मलकापूर यांच्या वतीने ‘फुले दांपत्य २०२६’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

वरोरा – आनंद निकेतन महाविद्यालय, आनंदवन येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात उपप्राचार्य डॉ. गोपाल वरुटकर यांनी अध्यक्षस्थान भूषवले तर प्रा. डॉ. नरेंद्र पाटील (अर्थशास्त्र विभाग प्रमुख) हे प्रमुख वक्ते म्हणून उपस्थित होते. प्रा. नीरज आत्राम (राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी) यांचीही प्रमुख उपस्थिती लाभली.

Leave a Comment