हवामानबाजारभावशासन निर्णयनिवडणूकक्राईमनोकरीयोजनाफायनान्सलाइफस्टाइलगुंतवणूकऑटोएआयखेळआध्यात्मिकसिनेमा

ब्रेकिंग
पिंपळगाव राजा येथील गांजा प्रकरणात तपास अधिकओमसाई फाउंडेशनने गेल्या वर्षी ८० हून अधिक अपकाँग्रेस-वंचित युती कार्यकर्त्यांना राजकीय खामगाव : टॉवर चौकात विहिंप, बजरंग दल आणि सकल हियुगधर्म पब्लिक स्कूल खामगाव येथे CBSE दहावीचा सखामगाव: पिंपळगाव राजा येथील प्राचीन शिव मंदि

वरोरा – आनंद निकेतन महाविद्यालय, आनंदवन येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात उपप्राचार्य डॉ. गोपाल वरुटकर यांनी अध्यक्षस्थान भूषवले तर प्रा. डॉ. नरेंद्र पाटील (अर्थशास्त्र विभाग प्रमुख) हे प्रमुख वक्ते म्हणून उपस्थित होते. प्रा. नीरज आत्राम (राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी) यांचीही प्रमुख उपस्थिती लाभली.

On: April 15, 2026 5:27 PM
Follow Us:

अध्यक्षीय भाषणात डॉ. गोपाल वरुटकर यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवनकार्याचा सविस्तर आढावा घेतला. ते म्हणाले, “डॉ. बाबासाहेबांनी केवळ भारतीय संविधानाची रचना केली नाही, तर समाजातील वंचित आणि शोषित घटकांसाठी आयुष्यभर लढा दिला. शिक्षण, संघटन आणि संघर्ष या त्यांच्या त्रिसूत्रीचा प्रत्येक विद्यार्थ्याने अवलंब करावा.” त्यांनी विद्यार्थ्यांना सामाजिक समता जपत प्रगतीचा मार्ग निवडण्याचे आवाहन केले. आजच्या काळात बाबासाहेबांचे विचार अधिक प्रासंगिक असल्याचे सांगत तरुण पिढीने त्यांचे विचार आत्मसात करून देशाच्या विकासात योगदान द्यावे, असेही त्यांनी नमूद केले.

प्रमुख वक्ते प्रा. डॉ. नरेंद्र पाटील यांनी डॉ. आंबेडकरांच्या आर्थिक, सामाजिक आणि शैक्षणिक योगदानावर सखोल प्रकाश टाकला. “डॉ. आंबेडकर केवळ संविधान निर्माते नव्हते, तर दूरदृष्टी असलेले अर्थतज्ज्ञही होते. भारताच्या आर्थिक प्रगतीसाठी त्यांनी अनेक महत्त्वाचे धोरणात्मक विचार मांडले,” असे ते म्हणाले. विद्यार्थ्यांनी बाबासाहेबांच्या विचारांचे अनुसरण करून स्वावलंबी आणि जबाबदार नागरिक बनावे, तसेच सामाजिक बांधिलकी जपत समाजसेवेकडे वळावे, असा संदेश त्यांनी दिला.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. नीरज आत्राम यांनी केले. सूत्रसंचालन खुशाल शेरकी यांनी केले तर आभारप्रदर्शन अक्षरा बावणे हिने केले. कार्यक्रम यशस्वी करण्यात प्राचार्य डॉ. मृणाल काळे यांचे विशेष योगदान होते.

महाविद्यालयातील शिक्षकवर्ग आणि मोठ्या संख्येने विद्यार्थी यावेळी उपस्थित होते. संपूर्ण कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. शेवटी राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

हे पण वाचा

झाडेगाव : डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त स्मारकाला हार अर्पण; विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप व वृक्षारोपण

खामगाव – डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त स्वाभिमानी आंबेडकरवादी अधिकारी व कर्मचारी ग्रुपने भीम अनुयायांसाठी एक उपयुक्त सेवा पुरवली.

नांदुरा – डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त केवळ जल्लोष न करता, ज्ञानप्रसार आणि गरजू विद्यार्थ्यांना मदत करण्याचा स्तुत्य उपक्रम ‘सद् धम्म प्रबोधन आणि विपश्यना प्रशिक्षण ट्रस्ट’ने राबवला. नांदुरा येथे आयोजित कार्यक्रमात आदिवासी विद्यार्थ्याला आर्थिक मदत, महिलांना मोफत ग्रंथवाटप आणि पत्रकारांचा सन्मान यातून बाबासाहेबांच्या विचारांचा खरा वारसा साजरा करण्यात आला.

बुलडाणा बसस्थानकावर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या पूर्वसंधेला माता भिमाई व बाबासाहेबांना अभिवादन

डोंबिवलीत जनजागृती सेवा संस्थेच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३५वी जयंती उत्साहात साजरी

खामगावकरांचे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना सकाळी ६ वाजता अनोखे अभिवादन

Leave a Comment