हवामानबाजारभावशासन निर्णयनिवडणूकक्राईमनोकरीयोजनाफायनान्सलाइफस्टाइलगुंतवणूकऑटोएआयखेळआध्यात्मिकसिनेमा

ब्रेकिंग
खामगावकरांचे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना सकाजिल्हा शल्य चिकित्सक झोपला की काय? नियम पायदळकाँग्रेस-वंचित युती कार्यकर्त्यांना राजकीय केला हिंदी हायस्कूलचा मनमानी कारभार, गल्लीतीनिष्ठावंत कार्यकर्ते अमोल अंधारे यांची पक्षप्रखर प्रहार ब्रेकिंग: भाजप ची नगराध्यक्षा न

खामगाव – आत्मसन्मान फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष डॉ. विजय पाटील आणि त्यांच्या पत्नी शुभांगी पाटील या दांपत्याला बहुजन उद्धारक सेवा समिती, मलकापूर यांच्या वतीने ‘फुले दांपत्य २०२६’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

On: April 15, 2026 5:32 PM
Follow Us:

हा पुरस्कार वितरण सोहळा ११ एप्रिल २०२६ रोजी मलकापूर येथील शहीद संजय सिंग राजपूत स्मारकात पार पडला. बहुजन उद्धारक सेवा समितीचे पदाधिकारी आणि मान्यवरांच्या हस्ते डॉ. विजय पाटील व शुभांगी पाटील यांना सन्मान चिन्ह, सन्मानपत्र, शाल आणि श्रीफळ देऊन त्यांच्या सामाजिक कार्याचा गौरव करण्यात आला.

आत्मसन्मान फाउंडेशनच्या माध्यमातून पाटील दांपत्याने आपल्या सहकाऱ्यांसह शेकडो मानसिक आरोग्य समस्या असलेल्या व्यक्तींच्या कुटुंबांचे पालकत्व स्वीकारले आहे. त्याचबरोबर शेकडो विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदत पुरवून त्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणले. या मदतीमुळे अनेक विद्यार्थी आज स्वतंत्रपणे आपल्या पायावर उभे आहेत.

डोळ्यांनी दिसत नसल्याने अंधकारमय जीवन जगणाऱ्या व्यक्तींना ऑपरेशनसाठी आर्थिक मदत देऊन त्यांना पुन्हा दृष्टी प्राप्त करून दिली आहे. यामुळे अनेक अंध व्यक्ती आता स्वतःचे जग पाहू शकत आहेत. या व्यतिरिक्त विविध सामाजिक क्षेत्रात सक्रिय सहभाग घेत अनेक गरजू व्यक्तींना मदतीचा हात दिला आहे.

पाटील दांपत्याचे हे सातत्यपूर्ण आणि माणुसकीपूर्ण कार्य पाहून बहुजन उद्धारक सेवा समिती, मलकापूरने त्यांना फुले दांपत्य पुरस्काराने गौरवले. उपस्थितांनी दोघांचाही उत्साहवर्धक सत्कार करत त्यांच्या सामाजिक योगदानाबद्दल कौतुक व्यक्त केले.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

हे पण वाचा

नांदुरा – डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त केवळ जल्लोष न करता, ज्ञानप्रसार आणि गरजू विद्यार्थ्यांना मदत करण्याचा स्तुत्य उपक्रम ‘सद् धम्म प्रबोधन आणि विपश्यना प्रशिक्षण ट्रस्ट’ने राबवला. नांदुरा येथे आयोजित कार्यक्रमात आदिवासी विद्यार्थ्याला आर्थिक मदत, महिलांना मोफत ग्रंथवाटप आणि पत्रकारांचा सन्मान यातून बाबासाहेबांच्या विचारांचा खरा वारसा साजरा करण्यात आला.

बुलडाणा बसस्थानकावर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या पूर्वसंधेला माता भिमाई व बाबासाहेबांना अभिवादन

खामगावकरांचे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना सकाळी ६ वाजता अनोखे अभिवादन

खामगाव : डॉ. प्रवीणभाई तोगडिया यांचे हिंदुत्ववादी संघटनांच्या वतीने भव्य स्वागत; संघटित हिंदू समाजाची गरज अधोरेखित

बुलडाणा : डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराने प्रेरित रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट)तर्फे चिखली विधानसभा मतदारसंघाच्या आमदार श्वेताताई महाले पाटील आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे खासगी सचिव विद्याधरजी महाले यांचा भव्य सत्कार

“क्रांतीसूर्याचं देणं” काव्यसंग्रहासाठी कविता पाठविण्याची मुदत वाढली

Leave a Comment