हवामानबाजारभावशासन निर्णयनिवडणूकक्राईमनोकरीयोजनाफायनान्सलाइफस्टाइलगुंतवणूकऑटोएआयखेळआध्यात्मिकसिनेमा

ब्रेकिंग
केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांची खामगांधम्मदीप बुद्धविहार कोथळी येथे रामजी सपकाळ याठाणे जिल्हा वृत्तपत्र लेखक संघाची नवी कार्यकजिल्हा शल्य चिकित्सक झोपला की काय? नियम पायदळएस.टी. महामंडळ कर्मचारी ग्रुप आणि समता फाउंडेबुलडाणा : डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारा

ठाणे जिल्हा वृत्तपत्र लेखक संघाची नवी कार्यकारिणी जाहीर; सुनिल झळके यांची अध्यक्षपदी निवड

On: April 14, 2026 1:16 PM
Follow Us:

कल्याण (प्रतिनिधी) : ठाणे जिल्हा वृत्तपत्र लेखक संघाची गेल्या ३५ वर्षांची परंपरा आहे. कै. मधुसूदन ठोसर, कै. दि. भा. मुंडले, कै. अरुणकुमार भगत यांसारख्या संस्थापक सदस्यांच्या मेहनतीतून हा संघ उभा राहिला. आजही संघाच्या कार्यात जुने आणि नवे सभासद यांचे योगदान महत्त्वाचे आहे. अनेक सदस्यांनी आपल्या उमेदीच्या काळात संघासाठी विविध कार्यक्रम आयोजित करून आपली कार्यक्षमता सिद्ध केली आहे.

या पार्श्वभूमीवर रविवार, १२ एप्रिल २०२६ रोजी कल्याण येथील प्र. के. अत्रे नाट्यगृहाच्या मागील सुभाष मैदानावर नवनियुक्त कार्यकारिणीची निवड करण्यासाठी सभा आयोजित करण्यात आली होती. ज्येष्ठ सदस्य आर. एन. पिंजारी यांच्या अध्यक्षतेखाली ही सभा पार पडली.

सभा सर्वानुमते झाली असून, नवी कार्यकारिणी खालीलप्रमाणे निवडण्यात आली आहे :

  • अध्यक्ष : सुनिल झळके
  • सचिव : सूर्यकांत भडांगे
  • खजिनदार : अशोक हासे
  • सह-खजिनदार : अनंत बोरसे
  • कार्याध्यक्ष : विजय चव्हाण
  • उपाध्यक्ष : गुरुनाथ तिरपणकर
  • सहसचिव : मनोहर गायकवाड
  • कार्यकारिणी सदस्य : प्रदीप जोशी, नाना म्हात्रे
  • सल्लागार : अरविंद म्हात्रे, जैतु मुठोळकर, महादेव गोळवसकर, सुनिल इंगळे, विवेक मालशे, आर. एन. पिंजारी
  • प्रसिद्धी प्रमुख : गुरुनाथ तिरपणकर व सुभाष जैन

कार्यक्रमात अल्पोपाहाराची उत्तम व्यवस्था संघाचे सदस्य मनोहर गायकवाड यांनी केली होती. त्यांचे सर्वांनी आभार मानले.

सभेच्या शेवटी माजी अध्यक्ष अरविंद म्हात्रे यांच्या पत्नी प्रमिला अरविंद म्हात्रे यांच्या निधनाबद्दल श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.

जुन्या संस्थापक सदस्यांच्या मार्गदर्शनाखाली नवी कार्यकारिणी संघाच्या भविष्यातील कार्याला गती देईल, अशी अपेक्षा सर्व सभासदांनी व्यक्त केली.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment