हवामानबाजारभावशासन निर्णयनिवडणूकक्राईमनोकरीयोजनाफायनान्सलाइफस्टाइलगुंतवणूकऑटोएआयखेळआध्यात्मिकसिनेमा

ब्रेकिंग
ठाणे जिल्हा वृत्तपत्र लेखक संघाची नवी कार्यकओमसाई फाउंडेशनने गेल्या वर्षी ८० हून अधिक अपखामगाव : टॉवर चौकात विहिंप, बजरंग दल आणि सकल हिजिल्हा शल्य चिकित्सक झोपला की काय? नियम पायदळचिमुरडीवर अत्याचार करणाऱ्यांना चौकात फाशी दयुगधर्म पब्लिक स्कूल खामगाव येथे CBSE दहावीचा स

एस.टी. महामंडळ कर्मचारी ग्रुप आणि समता फाउंडेशनने दिव्यांग शाळेला दिली हृदयस्पर्शी भेट

On: April 14, 2026 1:20 PM
Follow Us:

जळगाव ( प्रतिनिधी): समाजातील वंचित आणि दिव्यांग मुलांप्रती संवेदनशीलता दाखवत एक सुंदर सामाजिक उपक्रम जळगावमध्ये पार पडला. इन्स्टिट्यूट फॉर रुरल डेव्हलपमेंट अँड सोशल सर्व्हिसेस, जळगाव यांच्या अंतर्गत चालणाऱ्या उत्कर्ष मतिमंद विद्यालयात एस.टी. महामंडळ कर्मचारी ग्रुप आणि समता फाउंडेशन मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने विद्यार्थ्यांसाठी विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला.

समता फाउंडेशन मुंबईच्या वतीने शाळेतील विद्यार्थ्यांना नवीन कपडे वाटप करण्यात आले. तसेच एस.टी. महामंडळ कर्मचारी ग्रुप आणि समता फाउंडेशन यांच्या संयुक्त प्रयत्नातून शाळेला एक फ्रीज भेट देण्यात आला. या भेटीमुळे शाळेच्या दैनंदिन सुविधांमध्ये मोठी भर पडली आहे.

कार्यक्रमादरम्यान समता फाउंडेशनच्या जळगाव जिल्हा समन्वयक आशा सुनिल तडवी, कोर्स तज्ञ संगिता पाटील आणि वाहतूक पोलीस सुनिल तडवी यांनी विद्यार्थ्यांना नवीन ड्रेस सप्रेम भेट दिले. नव्या कपड्यांमुळे मुलांच्या चेहऱ्यावर आनंदाची झळाळी दिसून आली. त्यांच्या डोळ्यातील समाधान आणि खुशीचा क्षण उपस्थित सर्वांसाठी अविस्मरणीय ठरला.

या प्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक संजय बोरसे आणि विकास तंत्रनिकेतनचे प्राचार्य अनंत महाजन यांची उपस्थिती होती. मान्यवरांनी विद्यार्थ्यांशी मनमोकळा संवाद साधला आणि त्यांना आत्मविश्वास, स्वावलंबन तसेच शिक्षणाचे महत्त्व समजावून सांगितले.

शाळेला मिळालेला फ्रीज विद्यार्थ्यांच्या रोजच्या गरजांसाठी खूप उपयुक्त ठरणार आहे. या उपक्रमातून ‘सेवा हीच खरी पूजा’ या भावनेचा प्रत्यक्ष अनुभव घेता आला. दिव्यांग विद्यार्थ्यांप्रती समाजाने जबाबदारी जपली पाहिजे, असा संदेश या कार्यक्रमातून देण्यात आला.

समता फाउंडेशन आणि एस.टी. महामंडळ कर्मचारी ग्रुपच्या या प्रयत्नांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे. अशा छोट्या-छोट्या उपक्रमांमुळे विशेष गरजा असलेल्या मुलांच्या आयुष्यात आनंदाचे रंग भरले जातात आणि त्यांना सकारात्मक ऊर्जा मिळते.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

हे पण वाचा

पिंपळगाव राजा येथील गांजा प्रकरणात तपास अधिकारी दिवसभर गायब; बारा तास होऊन ही गुन्हा दाखल नाही. पत्रकारांसोबत हुज्जत करणाऱ्या एपिआय मुंढे वर कारवाई होणार का?

मुख्याधिकारी, ठेकेदार आणि महावितरणच्या हलगर्जीपणामुळे समीरचा शॉक लागून मृत्यू – आरोप ” मोदी “च्या राज्यात “मनोज” म्हणतो माझे कुणीच काही करू शकत नाही “पोलीस माझ्या खिश्यात”!

चिमुरडीवर अत्याचार करणाऱ्यांना चौकात फाशी द्या; कांबळ्यापासून सुरुवात करावी

खामगाव : टॉवर चौकात विहिंप, बजरंग दल आणि सकल हिंदू समाजाच्या वतीने प्रखर निषेध आंदोलन

झाडेगाव : डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त स्मारकाला हार अर्पण; विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप व वृक्षारोपण

बुलडाणा बसस्थानकावर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या पूर्वसंधेला माता भिमाई व बाबासाहेबांना अभिवादन

Leave a Comment