हवामानबाजारभावशासन निर्णयनिवडणूकक्राईमनोकरीयोजनाफायनान्सलाइफस्टाइलगुंतवणूकऑटोएआयखेळआध्यात्मिकसिनेमा

ब्रेकिंग
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे मोहनराव पाटीशहरातील राजकारण नीच पातळीला; पती-पत्नीच्या पवरोरा – आनंद निकेतन महाविद्यालय, आनंदवन येथकाम बंद पडलेला भुयारी मार्ग, आंदोलन/उपोषण आणि खामगांवमध्ये आद्य क्रांतिगुरू लहुजी वस्ताद नांदुरा – डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयं

“क्रांतीसूर्याचं देणं” काव्यसंग्रहासाठी कविता पाठविण्याची मुदत वाढली

On: April 14, 2026 1:28 PM
Follow Us:

मुंबई ( प्रतिनिधी): महाड येथील ऐतिहासिक चवदार तळे सत्याग्रहाच्या शताब्दी वर्षानिमित्त (२०२६-२०२७) सार्थक साहित्य प्रकाशनतर्फे तयार होत असलेल्या “क्रांतीसूर्याचं देणं” या विशेष प्रातिनिधिक काव्यसंग्रहासाठी कविता पाठविण्याची मुदत वाढविण्यात आली आहे.

राज्यभरातील कवी-लेखकांकडून मिळालेल्या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे आणि अनेकांच्या विनंतीनुसार, कविता पाठविण्याची अंतिम मुदत आता २४ एप्रिल २०२६ पर्यंत वाढवण्यात आली आहे. या काव्यप्रकल्पात समता, सामाजिक न्याय, मानवता, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे प्रेरणादायी जीवनकार्य, त्यांचे मौलिक विचार, विविध सत्याग्रह आणि विशेषतः महाड चवदार तळ्याची क्रांती या विषयांवर आधारित आशयसंपन्न, विचारप्रवर्तक आणि मानवतावादी कविता अपेक्षित आहेत.

संग्रहासाठी प्राप्त होणाऱ्या कवितांमधून केवळ निवडक आणि उच्च दर्जाच्या कवितांचीच निवड केली जाणार आहे. कविता स्वतःची, पूर्णतः मौलिक आणि पूर्वी कुठेही प्रकाशित नसावी हे बंधनकारक आहे. प्रथम सहभाग नोंदवणाऱ्या कवींना प्राधान्य दिले जाईल.

इच्छुक कवींनी आपल्या कविता पाठवण्यापूर्वी अधिक माहिती जाणून घेण्यासाठी प्रा. आशा रणखांबे (सार्थक साहित्य प्रकाशन) किंवा साहित्यिक नवनाथ रणखांबे यांच्याशी संपर्क साधावा. संपर्क क्रमांक : ९९६७४३५०३२ / ९९६७४८०९३२.

या प्रकल्पाद्वारे महाड सत्याग्रहाच्या ऐतिहासिक घटनेची आठवण करून देण्यासोबतच सामाजिक न्याय आणि समतेच्या विचारांना काव्यातून बळ मिळेल, अशी अपेक्षा आयोजकांनी व्यक्त केली आहे. राज्यातील कवींनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

(प्रखर प्रहार न्यूज नेटवर्क)

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

हे पण वाचा

पिंपळगाव राजा येथील गांजा प्रकरणात तपास अधिकारी दिवसभर गायब; बारा तास होऊन ही गुन्हा दाखल नाही. पत्रकारांसोबत हुज्जत करणाऱ्या एपिआय मुंढे वर कारवाई होणार का?

नांदुरा – डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त केवळ जल्लोष न करता, ज्ञानप्रसार आणि गरजू विद्यार्थ्यांना मदत करण्याचा स्तुत्य उपक्रम ‘सद् धम्म प्रबोधन आणि विपश्यना प्रशिक्षण ट्रस्ट’ने राबवला. नांदुरा येथे आयोजित कार्यक्रमात आदिवासी विद्यार्थ्याला आर्थिक मदत, महिलांना मोफत ग्रंथवाटप आणि पत्रकारांचा सन्मान यातून बाबासाहेबांच्या विचारांचा खरा वारसा साजरा करण्यात आला.

बुलडाणा बसस्थानकावर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या पूर्वसंधेला माता भिमाई व बाबासाहेबांना अभिवादन

खामगाव – आत्मसन्मान फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष डॉ. विजय पाटील आणि त्यांच्या पत्नी शुभांगी पाटील या दांपत्याला बहुजन उद्धारक सेवा समिती, मलकापूर यांच्या वतीने ‘फुले दांपत्य २०२६’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

खामगावकरांचे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना सकाळी ६ वाजता अनोखे अभिवादन

खामगाव : डॉ. प्रवीणभाई तोगडिया यांचे हिंदुत्ववादी संघटनांच्या वतीने भव्य स्वागत; संघटित हिंदू समाजाची गरज अधोरेखित

Leave a Comment